होय, दहशतवाद्यांसोबत होतो! यासिन मलिकने मान्य केले गुन्हे, ‘या’ दिवशी सुनावण्यात येणार शिक्षा

Yasin Malik

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फुटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याने मंगळवारी दिल्ली न्यायालयात दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांच्या संदर्भात त्याच्यावरील सर्व आरोप मान्य केले आहेत. यामध्ये कठोर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्याअंतर्गत लावण्यात आलेल्या आरोपांचादेखील समावेश आहे. न्यायालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिकने न्यायालयाला सांगितलं की, तो कलम 16, 17 (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी … Read more

वार्‍यामुळे पूल पडला? IAS अधिकार्‍याचं उत्तर ऐकुण नितिन गडकरी झाले हैराण

Nitin Gadkari

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी सोमवारी एका आयएएस अधिकाऱ्याच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले. ज्याने बिहारच्या सुलतानगंजमधील बांधकामाधीन पुलाचा काही भाग “जोराच्या वाऱ्यामुळे” कोसळला असे विधान केले. 29 एप्रिल रोजी सुलतानगंजमध्ये गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग वादळात कोसळला होता. मात्र सुदैवाने … Read more

थेट विमानातच 6 प्रवाशांमध्ये गावठी स्टाईलमध्ये हाणामारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये फ्लाइटमध्ये काही जण एकामेकाला मारताना (Free Style Fight) दिसत आहेत. ते एकमेकांना जोरात धक्काबुक्की करत आहेत. फ्लाइटच्या आतून लोकांच्या किंकाळ्यासुद्धा ऐकू येत आहे. काय आहे नेमके प्रकरण ? बहुतेक प्रवासी फ्लाइटच्या आत या गोष्टीचा विचार करत असतात की, आकाशात विमान … Read more

“घराणेशाही जोपासणारे पक्ष लोकशाहीचे शत्रू”; नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर घणाघाती टीका

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या स्थापनेला आज तब्बल 42 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त देशासह अनेक राज्यांत भाजपतर्फे हा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअली कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. “देशातील सुरु असलेले … Read more

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरील थ्रीडी प्रतिमेचं नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरील … Read more

विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी मिशी ठेवणे कॉन्स्टेबलच्या आले अंगलट, डिपार्टमेंटने केली ‘ही’ कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या हटक्या स्टाईलमुळे सतत चर्चेत असतात. मात्र आपल्या ह्याच हटके स्टाइलमुळे एका पोलीस कॉन्स्टेबलला महागात पडले आहे. मध्यप्रदेश पोलिसात चालक म्हणून तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलवर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारख्या मिशा ठेवल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्या मिशां कापण्याचा आदेश देण्यात आला … Read more

महिलांची ऑनलाइन बोली लावायचा, बुल्ली बाय अ‍ॅपच्या मास्टमाइंडबद्दल झाला ‘हा’ मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील बहुचर्चित बुल्ली बाय अ‍ॅपचं कनेक्शन राजस्थानमध्ये असल्याचे समोर आले आहे. या हा अ‍ॅप डेव्हलप करणारा मास्टर माइंड 21 वर्षीय नीरज विश्नोई नागौर येथील रोटू गावातील आहे. नीरज इंजीनियरिंगचा विद्यार्थी आहे. तो या अ‍ॅपच्या माध्यमातून महिलांची ऑनलाइन बोली लावत होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आसाममधील जोरहाटमधून अटक केली आहे. नागौरच्या … Read more

साताऱ्याचा गाैरव : नवी दिल्लीत 26 जानेवारीच्या परेडमध्ये कास पठारचा चित्ररथ

सातारा | नवी दिल्ली येथे 26 जानेवारीसाठी परेडमध्ये चित्र रथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथावर कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरणार आहे. प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथील परेडमध्ये प्रत्येक राज्याचे चित्ररथ असतात. या चित्ररथामधून प्रत्येक राज्य आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असते. … Read more

पंतप्रधानांच्या सभेला सर्वच खुर्च्या रिकाम्या? म्हणुनच मोदींनी सुरक्षेचं कारण देत पळ काढला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत कोणतीही गोष्ट घडली कि त्याची जोरदार चरचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर होते. अशात पंजाब दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. या घटनेचीही चर्चा होऊ लागली आहे. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. या घटनेवरून काँग्रेसनेही … Read more

उद्योगनगरी औरंगाबादच्या शिरपेचात मनाचा तुरा ! देशातील निर्यातक्षम टॉप 30 जिल्ह्यांत लावला नंबर

export

औरंगाबाद – देशाबाहेर निर्यात करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये उद्योगनगरी औरंगाबादचे योगदान मोठे आहे. कोरोनाच्या संकटातदेखील उद्योगनगरी औरंगाबादने या क्षेत्रात आपला दबदबा दाखवून दिला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, निर्यातीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्याने देशात 27 वे स्थान पटकावले आहे. यामुळे उद्योगनगरी औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. देशातील ज्या जिल्ह्यांमधून औद्योगिक निर्यात केली … Read more