फलटणला गोष्ट एकाच्या तिसऱ्या लग्नातील राडेबाजीची : नातेवाईंकाना मारहाण

Phaltan Police

फलटण | दुधेबावी (ता. फलटण) मंगळवारी येथे सुरू असलेल्या एकाच्या तिसऱ्या लग्नातील राडेबाजी गोष्ट जोरदार चर्चेत आलेली आहे. तिसरे लग्न करत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने विरोध केल्याने मंदिरातच दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुधेबावी येथे गणेश वामन एकळ यांचे तिसरे … Read more

फलटणला सोन्याचे दागिने पाॅलिश करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी लांबविले

सातारा | फलटण येथे सोन्याचे दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने 2 तोळ्याचा नेकलेस आणि 2 तोळ्याचे गंठण असे 4 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात साै. विद्या शशिकांत चतुरे (वय 32, रा. सोनवडी बुद्रुक ता. फलटण) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, विद्या चतुरे यांनी … Read more

जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर

Gram Panchayat Election

सातारा | जानेवारी 2021 ते मे 2022 व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सातारा जिल्ह्यातील एकूण 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकीकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सदर निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील असे उपजिल्हाधिकारी … Read more

हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या : सासूसह चाैघांवर गुन्हा दाखल

फलटण | सोनगाव (ता. फलटण) येथे माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नाही. त्यामुळे विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली होती. विवाहितेचा छळ व जाचहाट करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, सासरे, दीर व जाऊ अशा चौघांवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उज्ज्वला अनिल येजगर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. … Read more

फलटणला दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

सातारा | लोणंद पोलीसांचे रात्रगस्तीचे पथक हे गस्त घालीत असताना पाडेगांव येथील नेवसेवस्ती (ता. फलटण) गांवाचे हद्दीत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच इसमांना त्यांच्याकडील हत्यारासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सखोल तपास करुन लोणंद, तसेच फलटण व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहीरीवरील चोरी केलेल्या इलेक्ट्रीक मोटारी, एक HTP पंप व पाण्याचे वॉल असा एकुण 1 लाख 54 हजार … Read more

निवडणुकीत तिकिट पाहिजे तर 10 झाडे लावा : रामराजे नाईक- निंबाळकर

सातारा | जागतीक पर्यावरण दिनानिमीत्त फलटण मध्ये 1000 झाडं लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक व्यक्तीने 10 झाडं लावली पाहिजेत, अन्यथा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही. तेव्हा तिकिट पाहिजे त्यांनी 10 झाडं लावून दाखवावीत किंवा आमच्याकडे आणून द्यावीत, असा फतवाच विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढला. फलणट येथे या उपक्रमाचा शुभारंभ विधानपरिषद सभापती … Read more

डोळ्यादेखत चोरी : ट्रायल घ्यायला गेला तो बुलेटसह गायब

फलटण | चोरटे कधी काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. चोरी डोळ्यादेखत ही होवू शकते, यांचा प्रत्यय फलटणमधील एका गाडी विक्री व्यवसायिकास आला आहे. चक्क बुलेट खरेदी करण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकाने ट्रायल घेण्यासाठी जातो म्हणून गेला, ते बुलेट घेवून लंपास झाला आहे. याबाबतची फलटण शहर पोलिस ठाण्यात एका संशयिताविरूध्द तक्रार दाखल झाली आहे. सौरभ सावंत … Read more

गिरवीची नळ पाणी पुरवठा योजना साैरऊर्जेवर

फलटण | फलटण तालुक्याच्या पुर्व भागातील गावांना वरदान ठरलेली गिरवी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही आता सौरउर्जेवर चालवण्याचे आदेश विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या उर्जा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महाउर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गिरवी नळ पाणीपुरवठा योजनेला भेट दिली व तातडीने पुढील कार्यवाही करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. गिरवी … Read more

खा. रणजिंतसिंहाचे खुले आव्हान : रामराजेंनी माझ्या विरोधात लोकसभा लढवावी

Nike Nimbalkar

फलटण | मला व माझ्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्यापेक्षा जर तुमच्यात हिमंत असेल तर माझ्या विरोधात लोकसभा निवडावी, असे थेट आवाहन खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे- नाईक निंबाळकर यांना एका कार्यक्रमात दिले आहे. फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला व माझ्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मी कच्च्या गुरुचा … Read more

भेसळयुक्त ऑईल, डांबर वाहतूक प्रकरणात 35 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटण शहर पोलीस स्टेशनकडील ट्राॅफीकचे कर्मचाऱ्यांना फलटण येथील बारामती पुल येथे नाकाबंदी करीत असताना बेकायदेशीर भेसळयुक्त ऑईलचे 34 बॅरल मिळून आले तर डांबराचे 52 बॅरल आणि एक माल ट्रक असा एकुण 35 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ट्रक चालकांसह चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more