कबड्डीत पुरूष गटात फलटण तर महिलांच्यात अकलूजचा संघ विजयी

Kabaddi College Sports

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने आंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्‍पर्धांची सोपविलेली जबाबदारी सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाने उत्‍कृष्‍ठ पद्धतीने सांभाळली, राज्‍यभरातील विविध कृषी महाविद्यालयांतील पुरूषांचे 41 संघ आणि महिलांचे 19 संघ सहभागी झाले होते. महाविद्यालय व्यवस्‍थापन समितीचे अध्यक्ष जशराज पाटील (बाबा) आणि त्‍यांच्या सहकारी संचालकांनी पावसामुळे लाबणीवर पडलेल्‍या स्‍पर्धा पुन्हा मोठ्या उत्‍साहात … Read more

तहसील कार्यालयात अव्वल कारकून आणि साथीदार लाच घेताना सापडले

ACB

फलटण | अलगुडेवाडी (ता. फलटण) येथे घराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने त्याचे ग्रामपंचायतीमध्ये संमतीपत्र मंजूर करण्याच्या हेतूने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आणि त्याच्या साथीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की अलगुडेवाडी येथील तक्रारदार यांच्या घराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रस्ता हवा असल्यास ग्रामपंचायत दप्तरी नोंद … Read more

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला 7 वर्षाची शिक्षा

Phaltan Police

सातारा | विवाहितेचा जाचहाट करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला 7 वर्षांची शिक्षा न्यायाधिश एस. आर. सालकुटे यांनी ठोठावली. रोहित भास्कर घाडगे (वय- 23, रा. जिंती ता. फलटण) असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर दिपाली रोहित घाडगे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दिपालीचा भाऊ श्रीनाथ संपत माने (वय- 21, रा. पिंपळवाडी … Read more

आठवडा बाजारात दुचाकींची समोरासमोर धडक : युवक जागीच ठार

वाठार | पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे आठवडा बाजारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तरुण जागीच ठार झाला. वाठार-सोळशी रस्त्यावर संभाजी महाराज पतसंस्थेनजीक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तेजा रमेश भोसले (वय- 40, रा, तरडगाव, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. तर दत्तात्रय चंद्रशेखर नेवसे (वय- 23, रा. करंजखोप, ता. कोरेगाव) हा युवक … Read more

भिलकटी येथे गावठी दारूविक्री प्रकरणी एकास अटक

Phaltan Police

फलटण | गावठी दारू तयार करून तिची विक्री करण्यात येत असलेल्या भिलकटी (ता. फलटण) येथे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून 1 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून, यापैकी एकास अटक करण्यात आली आहे. सनी सोनवणे, पोपट गुंजाळ, किशोर आवारे (तिघेही रा. मंगळवार पेठ, फलटण), संदीप … Read more

दिगंबर आगवणेंचा तुरूंगात आत्महत्येचा प्रयत्न : मुलाचा थेट आरोप खासदारांवर

फलटण | फलटण येथील आयुर उद्योग समूहाचे संस्थापक दिगंबर आगवणे यांनी लोणंद पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतर आगवणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेथून त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दिगंबर आगवणे आणि माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात गेले काही महिने जुन्या व्यवहारातून वाद सुरू … Read more

`तू मला फार आवडतेस, तू माझी झाली पाहिजे` म्हणत ग्रामसेविकेस मारहाण

Phaltan Police

फलटण | फलटण तालुक्यात ग्रामसेवक पदावरती काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग एका सहकारी ग्रामसेवकाने करत शिवीगाळ करुन मारहाण प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 22 रोजी सायंकाळी 5. 30 वाजण्याच्या सुमारास मौजे गोळेवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय गोळेवाडी येथे राजाराम शंकर ढोक ताथवडा … Read more

पुणे – पंढरपूर रोडवर अपघातात 22 वर्षीय युवती ठार

फलटण | फलटण शहरातील पुणे- पंढरपुर रोड लगत असलेल्या रानाडे पेट्रोल पंप शेजारी असलेल्या गॅलेक्सी हॉटेल समोर एका डंपरचा व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 22 वर्षीय युवती जागीच ठार झाली. काजल धनंजय कुतवळ (रा. चौधरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे ठार झालेल्या युवतीचे नांव आहे‌. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज … Read more

शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक : जागीच 3 युवक ठार, 3 गंभीर जखमी

फलटण | फलटण-शिंगणापूर रस्त्यावर वडले गावच्या हद्दीमध्ये ट्रीपल सीट असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात तीनजण जागीच ठार व 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज रविवारी दि. 14 आॅगस्ट रोजी दुपारी ही दुर्देवी घटना घडली असून घटनास्थळी फलटण पोलिस दाखल झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, … Read more

दिगंबर आगवणेंना फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडी

फलटण | स्वराज पतसंस्थेची बदनामी करून वसुलीस गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करणे तसेच जातीवाचक बोलण्याचे भासवून खोट्या तक्रारी दिल्याने दिगंबर आगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात दिगंबर आगवणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून दोन बड्या नेत्यांमधील वाद कायद्याच्या कचाट्यात सुरू झाला आहे. या … Read more