पुणे- बेंगलोर महामार्गावर ट्रॅक्टर- कारच्या धडकेत १ महिला ठार ४ जखमी

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथे बुधवारी पहाटे उसाने भरलेला ट्रॅक्टर- ट्रॉली व कारचा अपघात झाला. यामध्ये सविता शांतीनाथ बेडकीहाळे (वय 52, रा. भोज, ता. चिकोडी) ही महिला ठार झाली. तर चार जण जखमी झाले आहेत.

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अपघातात वाढदिवसादिवशीच तरुणाचा मृत्यू

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील डी-मार्ट नजिक ॲपे रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या धडकेत एका मोटरसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. सचिन कोळी असं तरुणाचं नाव असून तो उदगाव येथील रहिवाशी होता. या अपघातात ॲपे रिक्षामधील प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत. मोहसिन मुबारख निपाणीकर, शाहिदा निपाणीकर, नाजिया मोहसिन निपाणीकर, सुजान मोहसिन निपाणीकर, प्रकाश अण्णा जावळेकर अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

उत्तरप्रदेशात बस आणि ट्रकचा भीषण अपघात;२० जणांचा आगीत होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील कन्नौज इथं शुक्रवारी रात्री जीटी रोड महामार्गावर बस आणि ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये ४५ प्रवाशी होते. त्यातील २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ताफा थांबवून मुख्यमंत्री धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

राजकीय नेत्यांमध्येही माणुसकी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कृतीतून दिसून आला. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जात होते. याप्रवासात पोंडा शहरापासून ३५ किमी असलेल्या खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. यावेळी पेशाने डॉक्टर असलेल्या सावंत यांनी आपला ताफा थांबवून प्रोटोकॉल तोडत अपघातग्रस्त जखमी युवकाला मदत केली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील घटना

स्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनांची धडक बसून एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील पिंपरीपेंढारा गावात घडली आहे. हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

…अन कोल्हापूरकरांनी केला खड्ड्यांचा वाढदिवस साजरा

रस्त्यावर काढलेली पांढरी रांगोळी भोवताली पसरलेल्या फुलांच्या पाकळ्या या सगळ्याकडे पाहून आपल्याला वाटेल कि इथं कुंचही तरी मिरवणूक येणार आहे. पण हि मिरवणूक नसून

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या बसला अपघात; ११ विद्यार्थिनींसह ३ शिक्षक जखमी

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस  रस्त्याच्या कडेला असलेल्या घड्ड्यात गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

खर्डा ग्रमस्थांचे खड्ड्यात आंदोलन;महामार्गाच्या खड्ड्यांनी नागरिक हैराण

शिर्डी – हैदराबाद राज्य महामार्गावर खर्डा परिसरात गेली अनेक दिवसांपासून खडे पडून वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.

एसटी बसने विद्यार्थ्याला चिरडले; बस चालकाचा पोबारा

मागून येणाऱ्या एसटी बसने या मुलाला धडक दिली. या धडकेत मुलगा बस खाली चिरडला गेल्याचे लक्षात येताच बस चालकाने  पोबारा केला आहे.

उसतोड मजुरांच्या टेम्पो ट्रकला भीषण अपघात, ७ ठार १५ जखमी

उस्मानाबाद येथे मजूर घेऊन जाणारी गाडी धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे अपघात होऊन ७ ठार १५ जखमी झाल्याचे वृत्त आहे. पहाटेची घटना जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.