कौतुकास्पद! विवाह सोहळ्यात वाटले २५१ हेल्मेट

सांगली प्रतिनिधी । दुष्काळी जत तालुक्यातील अपघातग्रस्तांना तात्काळ मदतीचा हात मिळावा., त्यांचे प्राण वाचावेत यासाठी चिकालागीं मठाचे मठाधीपदी तुकाराम महाराज यांनी जत तालुक्यात मानव मित्र हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. तुकाराम महाराजांची हि संकल्पना अनेकांना आवडली आहे. पुणे येथील उद्योगपती बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यात हार तुऱ्यांना फाटा देत २५१ हेल्मेट लग्नामध्ये … Read more

पाथरी-मानवत मार्गावर दोन वाहनात समोरासमोर धडक; एक ठार एक जखमी

परभणी प्रतीनिधी । गजानन घुंबरे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर गुरुवारी रात्री वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या तयारीत असणाऱ्या पिकअप जीप व समोरून येणाऱ्या मॅक्स जीपमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला असून यामध्ये जीपचा अक्षरशः चुराडा झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर पाथरी-मानवत मार्गावर अंजली लॉन्स समोर गुरुवार दि.२० फेब्रुवारी … Read more

खंबाटकी घाटात ‘बर्निंग कार’चा थरार; जीवितहानी टळली

सातारा | सकलेन मुलाणी खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून बाहेर उडी घेतली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. चालक बाहेर पडताच क्षणार्धातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी आणि खंडाळा … Read more

मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून घरी परतणाऱ्या वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-सोलापूर रोडवर काळेगाव पाटीजवळ एक विचित्र अपघात घडला. या अपघातात दोन दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन दोन्ही दुचाकी जागीच पेटल्या. या आगीच्या भडक्यामध्ये एक जण जागीच मृत झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने बार्शीला हलवण्यात आले आहे. या अपघातात मोहोळ तालुक्यातील वाळूजचे सुरतिशेन मोटे व रामचंद्र मोटे … Read more

कर्नाटक परिवहन मंडळाच्या आराम बसला आग; 30 प्रवाशी बचावले

अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी बसमधील 30 प्रवासी सुखरुप बाहेर पडले.

पुणे- बेंगलोर महामार्गावर ट्रॅक्टर- कारच्या धडकेत १ महिला ठार ४ जखमी

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथे बुधवारी पहाटे उसाने भरलेला ट्रॅक्टर- ट्रॉली व कारचा अपघात झाला. यामध्ये सविता शांतीनाथ बेडकीहाळे (वय 52, रा. भोज, ता. चिकोडी) ही महिला ठार झाली. तर चार जण जखमी झाले आहेत.

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अपघातात वाढदिवसादिवशीच तरुणाचा मृत्यू

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील डी-मार्ट नजिक ॲपे रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या धडकेत एका मोटरसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. सचिन कोळी असं तरुणाचं नाव असून तो उदगाव येथील रहिवाशी होता. या अपघातात ॲपे रिक्षामधील प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत. मोहसिन मुबारख निपाणीकर, शाहिदा निपाणीकर, नाजिया मोहसिन निपाणीकर, सुजान मोहसिन निपाणीकर, प्रकाश अण्णा जावळेकर अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

उत्तरप्रदेशात बस आणि ट्रकचा भीषण अपघात;२० जणांचा आगीत होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील कन्नौज इथं शुक्रवारी रात्री जीटी रोड महामार्गावर बस आणि ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये ४५ प्रवाशी होते. त्यातील २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ताफा थांबवून मुख्यमंत्री धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

राजकीय नेत्यांमध्येही माणुसकी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कृतीतून दिसून आला. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जात होते. याप्रवासात पोंडा शहरापासून ३५ किमी असलेल्या खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. यावेळी पेशाने डॉक्टर असलेल्या सावंत यांनी आपला ताफा थांबवून प्रोटोकॉल तोडत अपघातग्रस्त जखमी युवकाला मदत केली.