गव्याने 60 वर्षीय वृध्दाचे काळीजच फाडले : पांढरेपाणी गावाला काळ्या पाण्याची शिक्षा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोरणा विभागातील पश्चिमेला अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या पांढरेपाणी गावातील 60 वर्षीय वृद्धावर गव्याने हल्ला करून काळीज फाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या वृध्दाला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखले केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून डोलीत बसवून 2 तास पळवत आणून 6 ते 7 … Read more

चारा आणायला गेलेल्या 14 वर्षाचा मुलाचा शाॅक लागून मृत्यू

कराड | वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने बकऱ्यांसाठी चारा आणण्यास गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. मुंढे (ता. कराड) येथे दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. फरहान अमीर सय्यद (रा. गोटे, ता. कराड) असे मृताचे नाव आहे. पाय व हाताला झालेल्या जखमेवरून त्याला शॉक लागल्याचे वीज कंपनीचे सहायक अभियंता अमोल साठे यांनी सांगितले. या घटनेची … Read more

कराडात मोकाट कुत्र्यांनी 3 वर्षांचा चिमुकल्याचा घेतला जीव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या वाखाण भागातून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण भागात एका चिमुकल्याचा जीव मोकाट कुत्र्यांनी घेतला. राजवीर ओव्हाळ (वय 3) असे या मूलाचे नाव आहे. या घटनेमुळे पालकांच्यात घबराटीचे वातावरण असून राजवीरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दुपारी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू … Read more

सुभेदार विजय शिंदे यांच्यावर विसापूरला शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील विसापूर (ता. खटाव) येथील सुपुत्र सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचे पार्थिव आज पहाटे पुणे विमानतळावर दाखल झाले होते. तेथे लष्कर विभागाने विजय शिंदे यांना मानवंदना दिली. त्यानंतर पार्थिव मूळगाव विसापूर येथे आणण्यात आले. लोकांनी रस्त्याच्या दुर्तफा उभे राहून सुभेदार विजय शिंदे अमर रहे अशा घोषणा दिल्या. आज रविवारी … Read more

Video अमर रहे ! शहीद जवान प्रथमेश पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील सुपुत्र शहीद जवान प्रथमेश पवार यांचे पार्थिव आज पहाटे साताऱ्यात दाखल झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कुडाळ- पाचवड रोडवर हजारोंचा जनसमुदाय गोळा झाला आहे. लोक रस्त्याच्या दुर्तफा उभे राहून वीर जवान प्रथमेश पवार अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत. आज सोमवारी दि. 23 रोजी … Read more

कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा थर्माकोल सुटला अन् बुडून मृत्यू

कराड | शिरवडे येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने (वय- 14) असे बुडलेल्या मुलाचे नाव आहे. ओंकार ज्योतिर्लिंग विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होता. ओंकार मित्रांसोबत पोहण्यास गेला होता. याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार आपल्या चार मित्रांसोबत दुपारी कृष्णा नदीवरील पुलाजवळ पोहण्यास गेला होता. थर्माकोलच्या आधारे पोहण्याचा प्रयत्न … Read more

सुपने जिल्हा बँकेचे शाखाप्रमुख अजित शेडगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

देशमुखनगर | बोरगाव (ता.सातारा) येथील अजित विश्वनाथ शेडगे यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटकेने निधन झाले. ते 37 वर्षांचे होते. येथील वृत्तपत्र व्यवसायिक धनाजी शेडगे यांचे ते लहान बंधू होते. अजित शेडगे हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या सुपने (ता.कराड) शाखेचे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,दोन भाऊ,वहिनी असा परिवार आहे. खा. उदयनराजे … Read more

श्रीमती ताराबाई मुळे यांचे निधन

कराड | शहरातील आझाद चाैक येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यशवंत कोंडिबा मुळे यांच्या पत्नी श्रीमती ताराबाई यशवंत मुळे (वय 95) यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. श्रीमती ताराबाई मुळे यांचे रविवार पेठ परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य सैनिकांशीही त्यांचा ऋणानुबंध होता. काॅंग्रेसचे माजी शहराध्यक्ष दत्तात्रय मुळे यांच्या त्या आई होत. तर … Read more

सातारा जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सुरेश वीर यांचे निधन

सातारा | ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक किसन वीर यांचे पुत्र सुरेश वीर यांचे आज पहाटे (वय- 81) निधन झाले. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेश वीर हे किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माजी चेअरमन होते. किसनवीरांचा विधायक वारसा ते चालवत … Read more

खटाव तालुक्यातील पती- पत्नीचे 12 तासांत निधन झाल्याने हळहळ

खटाव | बनपुरी, (ता. खटाव) येथे पत्नीच्या निधनानंतर काही तासातच पतीचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. बनपुरी येथील प्रभावती रामचंद्र गुरव यांचे मंगळवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांना बुधवारी सकाळी 8 वाजता अग्नी देण्यात आला. त्यानंतर केवळ दोन तासाने बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पती रामचंद्र अनंत गुरव (वय- 82) यांचेही … Read more