जयंती विशेष : आर. आर. आबांचा केवळ 8 रुपयांसाठी शरद पवारांना विरोध

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी : विशाल वामनराव पाटील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील अंजनी गावातील रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील उर्फ महाराष्ट्राचे आबा यांची (जन्म दि. 16 ऑगस्ट 1957) आज जयंती. आबांच्या जीवनातील काही किस्से आर. आर. आबा पहिल्यापासूनच अत्यंत हुशार होते. आबा चाैथीत आणि सातवीत तालुक्यात पहिले होते. एसससी केंद्रात पहिले आले. पीडी आर्टसला सांगली … Read more

सरकारमधील भाजप मंत्री म्हणतायत : संजय राठोड, बच्चू कडू आमचे नाहीत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आमच्या भारतीय जनता पक्षात ज्यांच्यावर ठपका नसतो, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. संजय राठोडांना घेण्याबाबतचा निर्णय त्याच्या पक्षाच्या निर्णय आहे. बच्चू कडू आमचे नाहीत त्यामुळे त्याबाबत मी बोलणार नाही, असे स्पष्टच शिंदे- भाजप सरकारमध्ये शपथ घेतलेले मंत्री आ. सुरेश खाडे यांनी सांगितले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री सुरेश खाडे मिरजेला जात … Read more

सांगली ते मातोश्री पायी प्रवास : दोन युवक निष्ठा यात्रा घेवून ठाकरेंच्या भेटीला

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील 2 शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने भर पावसात पायी चालत निघाले आहेत. उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 7 ऑगस्ट रोजी पायी चालत निघालेले शिवसैनिक आज साताऱ्यात पोहचले आहेत. ठाकरे परिवार व शिवसेनेसोबत असलेली निष्ठा, प्रेम आणि मदतीचा हात देण्यासाठी अजय पाटील आणि अक्षय बुरूड पायी प्रवास करत … Read more

आज तिरंगा- तिरंगा करणारे पूर्वी तीन रंगाचा झेंडा अशुभ मानत : वृंदाताई खरात

सांगली | आज तिरंगा-तिरंगा करणारे पूर्वी तीन रंगाचा झेंडा अशुभ असल्याचा बहाना करत तिरंगा फडकवत नव्हते. राष्ट्रवादाचा पाठ शिकवणाऱ्यांनी खरा राष्ट्रवादी कसा असतो ते शिकावे. जनता संघर्ष करायला लागली की यांना धर्म आठवतो. ‘आमच्या पक्षात याल तर धुतल्या तांदळा सारखे शुभ्र आणि पवित्र व्हाल’ असा मोदीजींचा नारा आहे, असे मत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड वृंदाताई … Read more

शिंदे गटाचे आ. अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन

सांगली | खानापूर आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी सौ. शोभा बाबर तथा काकी यांचे आज (वय- 62) निधन झाले. पुणे येथील दिनानाथ मंगशेकर हाॅस्पीटलमध्ये गेल्या दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सौ. शोभा बाबर यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्‍याने काही दिवस त्‍यांच्यावर विट्यात एका खासगी … Read more

वैद्यकीय अधिकारी 1 हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडला

Sangali

सांगली | जत तालुक्यातील बिळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत असलेल्या उपचारासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहात लाचलुचपत विभागाने पकडले आहे. डॉ. प्रमोद मारूती कांबळे (वय- 46, रा. शिवाजी पेठ, जत, ता. जत) असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. जत पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती … Read more

क्लासमधील अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला सक्तमजुरीची शिक्षा

Crime

सांगली | क्लासमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल सर्जेराव महादेव शिंदे (वय- 52, रा. भगत प्लॉट, लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) या शिक्षकाला 5 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. न्यायालयाने आरोपी शिंदे याला दोषी धरुन 2 वर्षाची सक्त मजुरी व 10 हजार रुपये … Read more

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, जीप जप्त

सांगली | सातारा, सांगील जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या टोळीस विटा पोलिसांनी अटक केली आहे. तीन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकत जवळपास चार घरफोड्या उघडकीस आणत या चोरट्यांकडून 9 लाख 72 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, जीप याचा समावेश आहे. या चोरट्यांनी सांगली जिल्ह्यातील विटा, तासगाव आणि सातारा जिल्ह्यातील उंब्रज … Read more

फलटण- सांगली मार्गावर 719 किलो गुटख्यासह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

फलटण | झिरपवाडी (ता. फलटण) येथे फलटण शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यास सापळा रचुन अटक केली. यावेळी 719 किलो गुटखा व पिकअप असा मिळून 15 लाख 43 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. योगेश विलास सरगर (रा. मिरज जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विक्रीस … Read more

जिल्हा परिषद शाळेतील गरीब मुलांच्या आयुष्याशी खेळू नका, अन्यथा..; रासपच्या कालिदास गाढवेंचा प्रशासनाला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राष्ट्रीय समाज पक्षाच्या कालिदास पोपट गाढवे यांनी आटपाडीच्या पंचायत समितीस जिल्ह्या परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारणेबाबत व रिक्त पदे भरणेबाबत निवेदन दिले आहे. याशिवाय त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलांच्या आयुष्याशी खेळू नका असा कडक आणि तीव्र इशारा प्रशासनाला दिला आहे. या विषयास अनुसरून त्यांनी एक निवेदन दिले आहे. यात लिहिलंय कि, … Read more