अटकपूर्व जामीन फेटाळताच पलायन करणाऱ्या डाॅक्टरला पाठलाग करून पोलिसांनी पकडले

Crime

सांगली | सांगली जिल्ह्यातील मिरज येथील अॅपेक्स केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेश जाधव याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाठलाग करून पकडले. उपचारात हलगर्जीपणा व रुग्णांच्या मृतास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर डाॅ. जाधवने पलायन केले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. डॉ. … Read more

पतंगराव कदम यांचा शेअर्स सत्ताधाऱ्यांनी दिला नाही, पण मी घेणारच : मंत्री विश्वजित कदम

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णेच्या सूज्ञ सभासदांनी रयतेचे राज्य आणावे. रयत पॅनेल सभासदांच्या ऊसाला दर देण्यात कमी पडणार नाही. रयतच्या सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी वाघासारखे लढावे, विजय आपला आहे, असे सांगून पतंगराव कदम यांचा मयत शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी मी कारखान्यांकडे अर्ज केला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी अजूनही मला शेअर्स दिलेला नाही. परंतु मी हा शेअर्स … Read more

अनैतिक संबंधातून खून : पत्नीच्या सहाय्याने कामगारांनेच जेसीबी मालकांचा गुप्तांग कापून केला निर्घृण खून

सांगली | तासगाव येथील रहस्यमय खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. जेसीबीच्या मालकाचा त्याच्याच कामगाराने पत्नीच्या मदतीने अनैतिक संबंधातून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तासगावातील के. के. नगर येथे घरात हरी पाटील याच्या डोक्यात काठीने व खोऱ्याने मारहाण करून तसेच त्याचे गुप्तांग कापून निर्घृण खून केला होता. त्याचे प्रेत तसेच दोन … Read more

सांगली जिल्ह्यात उच्चांकी 10 हजार चाचण्या : नवे 1 हजार 10 पाॅझिटीव्ह तर 24 जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असताना शनिवारी संशयित रुग्णांच्या उच्चांकी 10 हजार 457 चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यातून नव्याने 1 हजार 10 रुग्ण आढळले असून पॉझिटिव्हीटी दर 9.91 टक्क्यांवर आला. तर 24 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 4 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 142 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 12, … Read more

कृषी विभागाची मोठी कारवाई : विनापरवाना 21 लाखांचा खतांचा मुद्देमाल जप्त

सांगली | खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांना खते रास्त दरात व गुणवत्ता पूर्ण उपलब्ध करुन देण्याकरिता तसेच विक्रेत्यांनी या निविष्ठांची शेतकऱ्यांना जादा दराने खते विक्री करू नये. खतांचा काळाबाजार करू नये तथा भेसळ युक्त खते शेतकऱ्यांना विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने 11 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी सांगली येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल … Read more

आरोपीच्या घरावर दगडफेक : मिरजेतील अल्पवयीन मुलीवर केला होता बलात्कार

सांगली | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी फैयाज मेहबुब कोकणे यांच्या बोकड चौकातील घरावर व दुकानावर जमावाने दगड फेक केली. तुफान दगडफेकीत दुकानाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच कोकणे यांच्या चिकण दुकानाचे शटरही मोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी बोकड चौकात बंदोबस्त वाढविला आहे. मिरजेतील बोकड चौक याठिकाणी चिकन दुकान चालवणाऱ्या फय्याज कोकणे या तरुणाकडून … Read more

मिरजेत अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

सांगली | अल्पवयीन मुलीला गोळ्या खायला देऊन तसेच अश्लिल व्हीडीओ दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, फैय्याज मेहबुब कोकाणे (वय 25, रा. बोकड चौक, यशवंत बँकेसमोर, मिरज) याला अटक करण्यात आली आहे. पिडीत मुलीच्या आईने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 22 मार्च … Read more

पॉझिटीव्ह दर कायम : सांगली जिल्ह्यात नवे 954 बाधित तर 27 जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट कमी होत असताना बुधवारी पुन्हा रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कायम राहिला. नवे रुग्ण ९५४ रुग्ण आढळल्याने पॉझिटिव्हीटी दर ११.७८ टक्क्यांवर गेला. तर २७ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय १०५९ जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे १३६ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात २०, कडेगाव १०१, खानापूर 59, पलूस ४५, तासगाव … Read more

तीन महिन्यानंतर जाळ्यात : पलूसमध्ये मंडल अधिकाऱ्याला 8 हजाराच्या लाचप्रकरणी अटक

सांगली | जमीन खरेदीच्या सातबारावरील नोंदीबाबत आलेला तक्रार अर्ज निकालात काढून, नोंद करून देण्यासाठी खासगी इसमामार्फत 10 हजाराची लाच मागून चर्चेअंती 8 हजारावर सौदा करणाऱ्या पलूस येथील मंडल अधिकारी किरण नामदेव भिंगारदेवे याला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) ही कारवाई केली. भिंगारदेवे यांच्याविरोधात या विभागाने तब्बल तीन महिन्यांपासून ‘सापळा’ लावला … Read more

विट्यातील दुर्घटना : गाडीचा स्टार्टर मारला, गाडीने पेट घेतला अन् चालक जळून खाक

Car Burn

सांगली | विटा शहरातील शाहू नगरमध्ये आज भीषण घटना घडली. रघुनाथ रामचंद्र ताटे (वय ५० रा. शाहूनगर, विटा) हे भाजीपाला व्यवसायीक त्यांच्या चारचाकी गाडीत बसले. गाडी सुरू करण्यासाठी त्यांनी स्टार्टर मारला. पण अचानक ठिणग्या उडून गाडीने पेट घेतला. क्षणार्धात गाडीसह रघुनाथ ताटे हे जळून खाक झाले. या भीषण घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. … Read more