‘या’ जिल्ह्यातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप सुरु

सांगली । नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर करा, वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करा यांसह प्रलंबित अन्य मागण्यांसाठी सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालय तसेच मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रुग्णालयातील सर्व विभाग यावेळी बंद राहणार आहेत. सांगली आणि मिरजेतील रुग्णालयाबाहेर मार्डच्या डॉक्टरांनी एकत्रित येत यावेळी शासनाच्या … Read more

“संपूर्ण राज्य सरकारलाच लकवा भरलाय “, चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका

सांगली । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे. या सरकारने कोणतेच काम पूर्ण केले नाही. मराठा आरक्षणापासून ते धनगर आरक्षणा पर्यंत आणि … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापेमारी, हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल जप्त

सांगली । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली एम, कर्नाळ, बोरगी याठिकाणी छापे टाकून हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यामध्ये १८६ लिटर हातभट्टी तसेच ६ हजार २२५ लिटर रसायन असा एकूण १ लाख ११ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने तीन ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. तसेच वेळेवर आस्थापने … Read more

नवीन वर्षात ‘या’ जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू, कोणत्याही कार्यक्रमासाठी आता फक्त 50 जणांनाच परवानगी

सांगली । सध्या राज्यात कोविड-19 विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार झपाट्याने वाढत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात होणार प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी लग्न / विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच उपस्थित राहण्यास परवानगी तसेच इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील बंदिस्त किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित … Read more

दिलासादायक ! जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पुन्हा मिळणार सामान्य कर्ज, अवकाळीने वाया गेलेल्या द्राक्षबागांना सवलतीचा विचार

सांगली । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्जाव्यतिरिक्त देण्यात येणारे सामान्य कर्ज पुन्हा वर्षभरानंतर देण्याबाबतचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ज्या सोसायट्यांची वसुली 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, त्यांना सामान्य कर्जाचा लाभ मिळणार असल्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट केले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीने पावसाने द्राक्षबागा वाया गेल्या आहेत. उध्वस्त झालेल्या बागायतदारांना दिलासा … Read more

जमिन माझ्या नावावर कर..दारुड्या मुलाने केला वडीलांचा खून

सांगली | जमीन वादातून दारुड्या पोराने आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना जत जवळील जाधव वस्तीवर मंगळवारी सायंकाळी घडली. या खूनप्रकरणी कृष्णा केशव जाधव यास जत पोलिसांनी अटक केली आहे, जतपासून दोन कि.मी. अंतरावर तंगडी वस्तीशेजारी असलेल्या जाधव वस्तीवर ही घटना घडली आहे. केशव तात्यासो जाधव व त्यांचा मुलगा कृष्णा केशव जाधव हे दोघे एकाच … Read more

चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी भाजपाकडून सांगली शहर पोलीस अधीक्षकांना निवेदन

सांगली | सांगली शहरात काही महिन्यांपासून घरफोड्या, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, वाटमारी तसेच मुलींवर होत असलेल्या छेडछाडी बाबत असे अनेक गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका सविता मदने, महिला मोर्चा प्रदेश … Read more

दिलासादायक ! तब्बल 18 तासांच्या थरारानंतर मार्केट यार्डातील गव्याला जेरबंद करण्यात यश

सांगली | सांगलीतल्या मार्केट यार्ड मध्ये आणि शहराच्या मध्यवर्ती भागात अलेल्या गव्याला पकडण्यात अखेर यश आले आहे. रात्री दीडच्या सुमारास या गव्याला सुस्थितीत पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात हलवण्यात आले. वनविभाग, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, डॉक्टर, प्राणिमित्र संघटना आदींच्या माध्यमातून सलग अठरा तास ही मोहीम सुरू होती. दरम्यान, गव्याला व्यवस्थितरित्या पकडून बाहेर सोडण्यात आल्याने नागरिकांनी आता … Read more

‘हळदीवरील पाच टक्के ‘जीएसटी’ मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार’ – दिनकर पाटील

सांगली । हळदीवर पाच टक्के जीएसटी लागू झाल्याने व्यापारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हळद हा शेतीमाल असून जीएसटी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले. सांगलीतील हळद बाजारपेठ मोठी असून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल हळद व्यापारात होते. सांगली हळद उद्योगाची प्रमुख नगरी आहे. हळद लागवड, काढणी … Read more

थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी बेघरांना निवारा केंद्रात देण्यात येणार गरम पाणी, ब्लँकेट, चादर, सतरंजी आदी सुविधा

सांगली । गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढत आहे. या थंडीच्या लाटेत उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी निवारा केंद्रात आसरा देण्यात येईल. त्यांना गरम पाणी, ब्लँकेट, चादर, सतरंजी आदी सुविधा देण्यात येणार आहे. दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत रस्त्यावर व उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व्यक्तींचे निवाऱ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेतर्फे अशा व्यक्तींची शोधमोहीम राबविली … Read more