एसटी -दुचाकी अपघातात एकजण ठार तर लहान मुलगी जखमी

कराड प्रतिनिधी | वाठार (ता. कराड) येथे एसटी बस दुचाकीच्या धडकेत एकजण ठार, तर एक लहान मुलगी जखमी झाली. कराड-कासारशिरंबे एसटी बसला पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. याप्रकरणी एसटी बस चालक सयाजी हिंदुराव यादव (वय 53) रा. अतित ता. जि. सातारा यांनी दुचाकी चालकाविरोधात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरव अनिल जाधव (रा. … Read more

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित’ चे एकदिवसीय धरणे आंदोलन

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले ३ कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.अशी धारणा वंचितची असून सदर कायदे रद्द करणेत यावेत. या मागणी करिता दिल्ली येथे दीर्घ काळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खंडाळा येथे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणा आंदोलन करण्यात आलेले आहे. यावेळी हे आंदोलन वंचितचे जिल्हा … Read more

साताऱ्यात ग्रेट सेपरेटर पुलाखाली स्टंट करुन इंस्टाग्राम वर व्हिडिओ टाकणे पडले महागात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात काही महिन्यांपूर्वीच ग्रग्रसेपरेटरचे उद्घाटन झाले व तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला परंतु या ग्रेड सेपरेटर खाली काही युवक मोठ्या आवाजात हाॅर्न व स्टंट बाजी करत असल्याच पोलिसांच्या निदर्शनास आले होते वेळोवेळी सांगून सुध्दा काही दिवसापूर्वी एका युवकाने बाईक वर स्टंटबाजी करत इंस्टाग्राम वर व्हिडिओ अपलोड केला होता. सातारा शहर … Read more

ज्येष्ठ नागरिक आणि व्याधिग्रस्त लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी नोंद करावी; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन

सातारा दि. 4 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात 1 मार्च पासुन कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिकांना तसेच 45 वर्षावरील कोमॉर्बीड (व्याधी असणारे) नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस घेतांना नागरिकांनी आधी आपले रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. लस घेतांना नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत … Read more

शिरवळ ग्रामपंचायत इमारतीच्या मोकळ्या जागेत दिव्यांगाचा उदरनिर्वाहासाठी संघर्ष

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड शिरवळ (ता.खंडाळा) येथील ग्रामपंचायतीच्या खाली मोकळ्या जागेत दिव्यांगांनी उदरनिर्वाहासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. शिरवळ ग्रामपंचायत मालकी हक्काचे व्यवसायिक १५० गाळे आहेत, त्यापैकी शासकीय नियमा नुसार दिव्यांगाना ५% राखीव गाळे दिले जात नाही .तोपर्यंत बेरोजगार दिव्यांगानी ग्रामपंचायत खाली मोकळ्या जागेत छोटा व्यवसाय करण्याचे ठरविलेले आहे. याबाबतचे निवेदन “प्रहार अपंग क्रांती … Read more

कराडची प्रशासकीय इमारत बनली “कचराकुंड़ी”; तहसिलदार, प्रांत रावसाहेबांसह शासकीय अधिकाऱ्यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील जनतेची शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावीत या उद्देशाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून प्रशासकीय इमारत उभी राहीली आहे. सुसज्ज व देखणी इमारत कराड शहरात उभी असून केवळ तिची देखभाल न केल्याने अस्वच्छतेच्या विळख्यात ही वास्तू सापडली आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारत कचराकुंडी बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तालुक्यातील … Read more

पाटण तालुक्यातून स्फोटकांचा मोठा साठा पोलिसांनी केला हस्तगत

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी नवारस्ता (ता. पाटण) येथील डोंगरालगत अवैधरीत्या सुरू असलेल्या दगड खाणी (क्रशर) वर पाटणचे तहसिलदार योगेश्‍वर टोंपे यांनी बुधवारी अचानक कारवाई करून दोन्ही खाणी सिल केल्या आहेत. या ठिकाणी स्फोटकांचा मोठा साठा पाटण पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकजणास ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पाटण पोलिसांनी … Read more

पोलीस निरीक्षक पदी किरण रासकर; खेड बुद्रुक ग्रामस्थांकडून सत्कार

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड. खेड बुद्रुक ता.खंडाळा येथील किरण रासकर यांची पोलीस निरीक्षक पदी बढती झालेली असून खेड बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आलेला आहे.यावेळी जेष्ठ नेते बबनराव धायगुडे- पाटील,सरपंच गणेश नामदेवराव धायगुडे-पाटील, सागर धायगुडे-पाटील, जेष्ठ मार्गदर्शक आप्पासो धायगुडे-पाटील, युवा नेते किरण धायगुडे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समिती खेड बुद्रुकचे अध्यक्ष सुनील … Read more

ऊसतोडीसाठी पैसे घेतल्यास बिलातून वसुली करण्याचा कृष्णा कारखान्याचा निर्णय; तोडणी यंत्रणेला इशारा

कराड, ता. ४ : उसतोडीसाठी पैसे घेतल्यास ते पैसे संबंधित तोडणी यंत्रणेच्या बिलातून वसूल करण्याचा निर्णय कृष्णा कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे. कारखान्याच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत केले जात आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे तोडणी यंत्रणेची कमतरता व जादा ऊस क्षेत्र यामुळे ऊस लवकरात लवकर कारखान्याकडे पाठविण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यातच कोरोनाच्या सावटामुळे उस तोडीअभावी शेतात राहू … Read more

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमांतून महिलांचे प्रश्न सोडवणार – सुचेता हाडंबर यांचे अंदोरी येथे प्रतिपादन

लोणंद प्रतिनिधी ।सुशिल गायकवाड सर्वच क्षेत्रामधे महिला पुरुषाच्या खांदयाला खांदा लावुन काम करत आहे.प्रत्येकाने महिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे.आगामी काळात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातुन महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारअसल्याचे प्रतिपादन खंडाळा तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा व अंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुचेता ऊर्फ छाया हाडंबर यांनी केले. खंडाळा तालुका महिला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने अंदोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या … Read more