घरफोडी : अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह 9 लाख 30 हजारांचा मुद्देमाल केला लंपास

crime

फलटण प्रतिनिधी |  प्रभाकर करचे फलटण तालुक्यातील पाच सर्कल खामगाव येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 9 लाख 30 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पाच सर्कल, खामगाव तालुका फलटण येथील बंद घराचे दरवाज्याचा कडी व कोयंडा … Read more

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरू होणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आज शुक्रवारी दि.18 जून रात्री बारा वाजल्यापासून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार अत्यावश्यक नसलेली दुकाने /आस्थापना यांना सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या जवळपास महिनाभरापासून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने नियम व अटी या नुसार सुरू … Read more

कोयना धरणातून पाणी सोडले : नदीकाठच्या गावांना व्यवस्थापनाचा सतर्कतेचा इशारा

Koyna Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असुन धरणात व नदीपात्रात पाण्याची पातळी वाढू लागली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने शुक्रवारी सकाळी कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदी पात्रात 2100 क्युसेक्स पाणी विसर्ग केला आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने कोयना … Read more

रस्ता बंद : चाफळ- पाटण मार्गावरील दाढोली घाटातील रस्ता खचला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चाफळ- दाढोली मार्गे सडावाघापूर, पाटणला जाणारा रस्ता दाढोली घाटात मोठ्या प्रमाणात खचला आहे. रस्ता खचल्याने चारचाकी व दुचाकी वाहनांकरिता पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहीती उंब्रज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली आहे. प्रभूरामांचे मंदिर असलेले चाफळ या गावातून पुढे पाटण … Read more

पोलिसांची कारवाई : चारचाकी व 1 हजार विदेशी दारूच्या बाटल्यासह 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिसांनी वर्णे गावच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.  दारूची वाहतूक करणाऱ्यांकडून 90 मिलीच्या 1 हजार विदेशी दारूच्या बाटल्या आणि चारचाकी असा मिळून 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वर्णे पोलिस स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अपशिंगे येथील दोघांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात … Read more

काळा बाजार : रेशनिंगचे धान्य खरेदी व विक्री करणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडले

सातारा | रेशनिंगचे धान्य काळ्या बाजाराने खरेदी करणाऱ्या सातारा तालुक्यातील चिंचणी येथील व्यापाऱ्याला मेढा पोलिसांनी पाठलाग करत पकडले. व्यापाऱ्यांकडून सहा लाख तेराशे रुपयांच्या धान्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वस्त धान्य दुकानदार दिलीप दिनकर महामुलकर (रा. करंदोशी, ता. जावळी) व माल विकत घेणारे विपुल महादेव केंजळे व नितीन सूर्यकांत गोळे … Read more

अनैतिक संबंधातून : प्रियकर, प्रेमिकेने केलेल्या चाकू हल्ल्यात तिघे जखमी

Crime

सातारा | अनैतिक संबंधातून चाकूने केलेल्या हल्ल्यात पत्नीसह तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शिरवळ येथे घडली. प्रेमसंबंधातून पतीनेच पत्नीवर, तर प्रेमिकेने प्रेमसंबंध असणाऱ्या प्रियकरांच्या सासूवर चाकूने हल्ला केला. यावेळी मेव्हण्यासही ढकलून देऊन जखमी केले. या घटनेतील गंभीर जखमी झालेली काळूराम वचकल यांची पत्नी, सासू व मेव्हणा यांच्यावर शिंदेवाडी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पती … Read more

चौकशीची मागणी : सर्पदंश झालेल्या मुलाचा लस व उपचार न मिळाल्याने मृत्यू

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील लेंढोरी या गावातील एका 14 वर्षीय मुलाला सर्पदंश झाला होता. परंतु सर्पदंश लस व उपचार वेळेत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सर्पदंश झाल्याने रोहित सुतार (वय 14) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या मुलाला पाटण व कराड येथे वेळेत सर्पदंश लस व उपचार न मिळाल्याने … Read more

सातारा जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात 938 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज गुरूवारी संध्याकाळपर्यंत 938 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात. जावली 54 (8228), कराड 205 (25197), खंडाळा 37 (11373), खटाव 61 (18541), … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : तिरंगी लढतीत 21 जागांसाठी अपक्ष तीनसह 66 जण रिंगणात

Krishana Karkhana Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून तिन्ही पॅनेलकडून उमेदवार अंतिम करण्यात आलेले आहेत. यामुळे तिन्ही पॅनेलचे 21 जागेवर उमेदवार निवडणुक रिंगणात असल्याने तीन अपक्षांसह एकूण 66 उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनेल उमेदवार यादी … Read more