परिस्थितीचा अंदाज घेऊन शहरातील शाळांबाबत निर्णय

औरंगाबाद – मुंबईत दररोज 8 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने तेथील मनपा प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात मंगळवारी 87 कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आम्ही परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत. लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊ अशी माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग … Read more

औरंगाबादेत शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, मनपाने 346 विद्यार्थ्यांचे घेतले स्वॅब

corona test

औरंगाबाद – औरंगपुऱ्यातील प्रसिद्ध प्रशालेत क्रीडा शिक्षकाचा कोरोना तपासणी अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझीटीव्ह आला. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी धसका घेतला. यामुळे सोबतच्या 53 शिक्षकांनी बुधवारीच आरोग्य केंद्रात धाव घेवून आरटीपीसीआर तपासणी करून घेतली. मंगळवारी पाचवी ते सातवी 403 तर बुधवारी 463 विद्यार्थी उपस्थित होते. तर पहीती ते दहावीच्या या शाळेत 54 शिक्षक असून दुपारच्या बॅचला … Read more

शहरातील 746 शाळांमध्ये आजपासून किलबिलाट

औरंगाबाद – कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा शहरात आज पासून सुरू होणार आहेत. शहरात शासकीय आणि खासगी अशा 746 शाळांची घंटा वाजणार आहे. विशेष म्हणजे तब्बल वीस महिन्यानंतर शाळांमध्ये पुन्हा एकदा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. मनपा प्रशासन अस्तिक कुमार पांडे यांच्या आदेशानुसार शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून … Read more

शहरातील शाळांना अखेर मुहूर्त मिळाला; ‘या’ तारखेपासून वाजणार घंटा

School will started

औरंगाबाद – शहरातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा येत्या 20 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडे यांनी घेतला आहे. त्यामुळे तब्बल पावणे दोन वर्षानंतर शहरातील प्राथमिक विभागाच्या शाळा गजबजणार आहेत. कोरोना व लॉकडाऊन मुळे राज्यातील प्राथमिक शाळा 16 मार्च दोन हजार वीस पासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने 1 डिसेंबर … Read more

शहरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर, आता ‘या’ तारखेनंतर होणार निर्णय

School will started

औरंगाबाद – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे चित्र असल्याने विविध जिल्हा आणि शहरांमधील शाळा पूर्ववत ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यासंबंधी विचार सुरु आहे. राज्य शासनाने यासाठी परवानगी दिलेली असली तरीही जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रशासनाने स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यातच आता ओमिक्रोनचा वाढता धोका लक्षात घेऊन … Read more

शहरातील शाळांना मुहूर्त मिळेना ! विद्यार्थी, पालकांसह शिक्षकही प्रतीक्षेत

औरंगाबाद – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने एक डिसेंबरपासून पहिलीच्या पुढील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. त्याअनुषंगाने ग्रामीण भागात शाळा सुरु झाल्या. मात्र, शहरातील शाळा सुरु करण्यास दहा डिसेंबरनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने कळविले. त्यामुळे पालक, बालक आणि शिक्षकही अस्वस्थ झाले आहेत. शाळेत येण्यासाठी अजून किती दिवस वाट पहावी लागणार? असा सवाल विद्यार्थी … Read more

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क माफ; वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वट करीत केली आहे. “कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून या वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क घेतले जाणार नसल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. “कोरोना महामारीमुळे आर्थिक … Read more

जिल्ह्यातील 2494 शाळांची 20 महिन्यांनी वाजली घंटा

औरंगाबाद – तब्बल वीस महिन्यानंतर पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांनी काल शाळेची वाट धरली. आईवडील आपल्या मुलांना शाळेच्या प्रांगणात सोडत होते. कुणाला मित्रांसोबत खेळायला मिळण्याचा आनंद होता, तर कुणी शाळेच्या भीतीने रडतखडत वर्गाकडे गेले. शाळांकडून नही फुगे, गुलाबपुष्प, बिस्किट देऊन तसेच रांगोळ्यांनी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील उत्साही कारभारी ही या उत्सवात सहभागी झाले. … Read more

ग्रामीण भागांतील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट

औरंगाबाद – राज्य शासनाने प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग बुधवारपासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करु जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रामध्ये भराव्यात, एका वर्गात जास्तीतजास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, विद्यार्थ्यामध्ये … Read more

एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर ‘विरजण’

औरंगाबाद – कोरोना व लॉकडाऊन नंतर कसेबसे शासनाने दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुन्हा एकदा सोमवारपासून नियमित शाळा, महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थी उपस्थिती संख्येवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर शासनाने शाळा सुरू … Read more