खासदार जयसिद्धेश्वर स्वामी जात प्रमाणपत्राचे पुरावे सादर करण्यास असमर्थ; निकाल विरोधात जाण्याची शक्यता

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी आज पूर्ण झाली. यावेळी खासदारांच्या वकिलांनी दिलेले 12 अर्ज जात पडताळणी समितीने फेटाळून लावले आहेत. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रावरील सुनावणी पूर्ण झाली असून आता टपालाद्वारे पडताळणी समितीने निकाल पोहच करणार आहे. जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामीजींनी तक्रारदारांने आक्षेप घेतलेली मूळ … Read more

यात्रेला मटण खायला न आल्याने युवकाचा खून; बाजार समितीच्या माजी संचालकासह ५ जणांना अटक

सोलापूर प्रतिनिधी । सध्या यात्रांचा सिझन चालू आहे. ताज्या यात्रेला पुरणाच्या पोळ्या आणि शिळ्या यात्रेला मटण, चिकन असा बेत महाराष्ट्रातील अनेक यात्रांमध्ये दिसून येतो. मित्र-मंडळी आणि नातेवाईकांना एकत्र बोलावण्याचा योग यात्रेनिमित्त साधला जातो. यामध्ये शिळ्या यात्रेदिवशी मद्यपी लोकांचा ‘वेगळा डाव’ त्यांच्या नियोजनानुसार रंगतो हे नवीन सांगायला नकोच. यात्रेवेळी वर्चस्वातून होणारी हाणामारी, भांडणतंटे हे पण चित्र … Read more

विद्यार्थिनीच्या ‘मला IAS व्हायचंय’ या कवितेनं जिल्हाधिकारी भारावले

सोलापूरमधील श्राविका शाळेच्या मुलींनी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निमंत्रण दिले. त्यावेळी एका विद्यार्थिनीने जिल्हाधिकाऱ्यांना मला IAS व्हायचंय ही कविता सादर केली. हि कविता ऐकून जिल्हाधिकारी हि भारावून गेले.

भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर प्रतिनिधी । भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफीया विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील नदीपात्रातून वाळूने भरलेल्या पाच ट्रॅक्टरसह २२ लाख रूपये किंमतीचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दहा वाळू चोरा विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या … Read more

दुर्दैवी! व्यायाम करताना ह्रदय विकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू; पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण

पोलिस अधिकारी व्हायचे या एकाच ध्येयाने व्यायाम आणि अभ्यास करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील अमोल पांडुरंग शिंदे या २२ वर्षाच्या तरुणांला व्यायाम करत असतानाच ह्दय विकाराचा तीव्र झटका आल्यानं त्याचा जागेवरती दुर्दैवी मृत्यु झाला. ऐन तारुण्यात काळाने घाला घातल्याने अमोलचे पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

साहित्यिक द.ता.भोसले यांच्या पुस्तकास राज्य शासनाचा पुरस्कार

सोलापूर प्रतिनिधी । ग्रामीण साहित्यिक द.ता.भोसले यांच्या “संवाद बळीराजाशी” या ‘सकाळ’ प्रकासनाच्या पुस्तकास राज्य शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रूपये रोख असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. भोसले यांना यापूर्वी राज्य शासनाचे सहा पुरस्कार मिळाले आहेत. भोसले यांनी अँग्रोवन मधून लेखन केले आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे अनेक स्थरातून अभिनंदन केलं जात … Read more

नव्या पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ?; नो व्हेईकल झोनवर कविता

पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? मला समजू नका वेडी…चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी…

भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यासह सात जण तडीपार; चार जिल्ह्यांतील टोळीविरूद्ध २४ गुन्हे दाखल

आष्टा येथील भाजपचे माजी पदाधिकारी प्रवीण माने यांच्यासह सात जणांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सांगलीसह कोल्हापूर, सातारा तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली. दत्तात्रय कोळेकर, अनिल गावडे, सचिन रास्कर, काशिनाथ ढोले, शोएब सनदी आणि उमेश रास्कर अशी टोळीतील अन्य गुन्हेगारांची नावे आहेत.

राजू शेट्टींनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री व्हावं- रविकांत तुपकर

सोलापूरमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारणी बैठक आज सोलापूरमध्ये पार पडली त्यात,अनेक कार्यकर्त्यांकडून राजू शेट्टींनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून कोणत्याही प्रमुख नेत्याने तसा प्रस्ताव दिला नाही अशी माहिती स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.

कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत तब्बल ११ हजार शेतकरी; सातबारावर नोंद नसल्याने अडचण

अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने त्यांचे कंबरडे मोडले. याचा परिणाम म्हणून आवक नसल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा राहिला त्यांना उच्चांकी भाव मिळाला. मात्र असंख्य शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. मात्र मागील वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले आले होते.