एसटीनेच सुरू केली खासगी बसने प्रवासी वाहतूक

ST Bus

औरंगाबाद – कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात एसटी महामंडळानेही आता कंबर कसली आहे. आता खासगी शिवशाही सुरु करण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. बारा) पुणे शहरासाठी दोन खासगी शिवशाही बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या. दरम्यान, शुक्रवारी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली नाही, त्यामुळे संपावरील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाला दहा दिवस होत आहेत. सुरवातीला मागे घेतलेला संप … Read more

महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स अशी ओळख असणार्‍या यशवंतराव मोहितेंनी लालपरी गावागावात पोहोचवली…

व्यक्तिविशेष | अक्षय पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एस. टी. कामगारांच्या मागण्या आणि संपाची चर्चा सुरू आहे. राज्य परिवन महामंडळाचे सरकार मध्ये विलनिकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. खर तर एस टी म्हणजे आपल्या या लालपरीला महाराष्टातील ग्रामीण भागाची जीवनदायीनी म्हंटले जाते. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस टी हे एस टी चे … Read more

एसटीचा तिढा कायम ! कर्मचारी संपावर तर महामंडळ निलंबनावर

औरंगाबाद – एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाईचा धडाका सुरूच असून काल औरंगाबाद विभागातील आणखी दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात सिडको बस स्थानकातील पाच आणि पैठण आकारातील पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना मध्ये संतापाची लाट उसळली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून तिसऱ्या दिवशी लढा सुरूच राहिला. औरंगाबाद शहरातील … Read more

खासगी वाहतूकदारांचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा ! मनमानी भाडेवसूलीला कोण रोखणार ?

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात संप पुकारल्याने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास खुद्द शासनानेच परवानगी दिली आहे. मात्र, त्यांच्याकडून किती भाडे आकारण्यात येत आहे. याकडे यंत्रणा दुर्लक्ष करत आहे त्यामुळे खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारून प्रवाशांच्या खिशावर एक प्रकारे दरोडा टाकत आहेत. औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानक तसेच सिडको बस … Read more

अधिकाऱ्यांचा सत्कार, सिडको बसस्थानकातील 5 कर्मचारी निलंबित

ST employee

औरंगाबाद – संपात भाग न घेता काम करणारे एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून संपकरी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली गांधीगिरी पाच जणांना चांगलीच भोवली आहे. त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई काल करण्यात आली. मंगळवारी संपा दरम्यान सेवा बजावणाऱ्या चालक वाहकांच्या बस मध्ये जाऊन संपकऱ्यांनी सत्कार केला. अधिकाऱ्यांनी हटकल्याने संपकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाही पुष्पहार घातला. यानंतर सिडको बस स्थानकातील पाच कर्मचाऱ्यांवर मंगळवारी … Read more

संपाच्या तिसऱ्या दिवशी औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा !

st

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने दिवाळीनंतर आपापल्या गावी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या प्रवाशांना या संपाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. रविवारपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला ! ऐन दिवाळीत प्रवाशांचे बेहाल तर एसटीला 24 लाखांचे नुकसान

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने दिवाळीनंतर आपापल्या गावी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या प्रवाशांना या संपाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद सिडको, पैठण, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, सोयगाव या आगारातील कर्मचाऱ्यांनी काल सकाळपासूनच काम बंद आंदोलन केले … Read more

दुसऱ्यादिवशीही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने औरंगाबादकर त्रस्त; खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा फटका दुसऱ्यादिवशीही औरंगाबादकरांना बसला आहे. आजही शुक्रवारी देखील पूर्ण क्षमतेने एसटी बसेस धावत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहे. अनेकांना इच्छा नसतानाही खासगी वाहनाने अतिरिक्त पैसे मजवून प्रवाश करावा लागत आहे. दुसरीकडे औरंगाबादमधील शहर बससेवाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शहरवासीयांना रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. येथील सिडको बसस्थानकात … Read more

…अन अजिंठ्यात पर्यटकांनी केली बैलगाडीतून सफर

ajintha

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे.याचा मोठा फटका प्रवासी आणि पर्यटकांना बसत आहे. आज सकाळी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची बस बंद असल्याने मोठी गैरसोय झाली. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी बैलगाडीची व्यवस्था केल्याने पर्यटकांना लेणींमध्ये जाण्यासाठी बैलगाडीची सवारी मिळाली. एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण … Read more

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीची वाहतूक विस्कळित; कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणामुळे शहर बसही ठप्प

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. या उपोषणात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याबरोबरच शहर बसही … Read more