तसा विचार केला तर मग ६० वर्षांवरील राजकारण्यांनीही राजीनामे द्यावेत; विक्रम गोखले संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकांच्या चित्रीकरणाच्या सेटवर ६० वर्षांवरील कलाकारांना परवानगी नाही. राज्य सरकारच्या या निर्णयावर अभिनेते विक्रम गोखले चांगलेच संतापले आहेत. कलाकारांसाठी असा कायदा असेल तर मग ६० वर्षांवरील नेत्यांनी आपले राजीनामे द्यावेत. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असे विक्रम गोखले यांनी म्हटले. मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काही दिवसांपूर्वीच मालिकांच्या चित्रीकरणाला अटी-शर्तींसह परवानगी … Read more

भारताकडून चीनला आणखी एक फटका; केंद्र सरकारने केला ‘या’ कायद्यात बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्या संबंधावर अनेक परिणाम झाले आहेत. त्या झालेल्या चकमकीत भारताच जे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचे ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर जाऊन भारतीय जवानांची भेट घेतली. भारताने चीनची सर्व बाजूनी कोंडी करत चीनच्या ५९ अँप वर … Read more

व्हेजिटेबल बटरमुळे वाढतोय कोरोना; राज्य शासनाचे केंद्राला पत्र

मुंबई । अनके दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अनेकांनी जीव पण गमावला आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लोकांकडून दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे.अश्यातच राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पत्र पाठवून व्हेजिटेबल बटर मुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. व्हेजिटेबल बटर आणि दुग्धजन्य बटर त्यांचा कलर सेम असल्याने लोकांची फसवणूक होत आहे . बटर म्हंटल कि … Read more

मृत्यूनंतर २७ वर्षाचा मुलगा ठरला आठ लोकांसाठी देवदूत

तिरुअनंतपुरम । कोरोनाच्या काळात अवयवदान करणे म्हणजे एक पर्वणी असते. तिरुअनंतपुरम येथे राहत असलेल्या २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरच्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अवयव दान केल्यानंतर अनेकांना जीवनदान मिळू शकते. १७ जुलै ला केरळ मध्ये राहत असलेल्या अणुजीतचा मृत्यू हा ब्रेन डेड मुळे झाला होता. त्याच्या बायकोने आणि त्याच्या बहिणीने अनुजीत च्या … Read more

EESL सुरू करणार ग्रामीण उजाला हा कार्यक्रम, १० रुपयांत देणार LED बल्ब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि (ईईएसएल) आता लवकरच वीज बिल कमी करण्याच्या माध्यमातून गावांमध्ये ऊर्जा दक्षता नेण्यासाठी आणि लोकांची बचत वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामीण उजाला हा नवीन कार्यक्रम सुरू करणार आहे. याबाबत माहिती देताना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार म्हणाले की, या अंतर्गत गावांमध्ये प्रति कुटूंब दहा रुपये दराने 3 ते … Read more

पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजना: जर तुम्हालाही मिळाले नसतील 6000 रुपये तर करा ‘या’ हेल्पलाईनवर कॉल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 18 महिन्यांत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सुमारे 10 कोटी 9 लाख शेतकरी कुटुंबियांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आलेले आहेत. या योजनेंतर्गत अजून 4 कोटी 40 लाख लोकांना मदत पाठवावी लागेल. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ज्या शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या बँक खात्यातील … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! आता 31 जुलै पर्यंत नोंदणी करणाऱ्यांनाच मिळेल सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेतकरी असल्यास आपल्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे. खरिपाच्या पिकांना दुष्काळ, पूर, भूस्खलन, अवकाळी पाऊस, गारपीट, कीटकांचे हल्ले, नैसर्गिक अग्नि आणि चक्रीवादळ यांसारख्या जोखमीपासून संरक्षण द्यायचे असेल तर पंतप्रधान पीक विमा योजना घ्या. आता पीक विम्यासाठीचे रजिस्ट्रेशन मोफत केले आहे. फक्त प्रीमियम जमा करावा लागेल. धान्य व तेलबिया या पिकासाठी केवळ … Read more

अशाप्रकारे मिळतो आहे 50 किलो तांदूळ केवळ 75 रुपयांना, खूपच उपयुक्त आहे मोदी सरकारची ‘ही’ योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारची पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही सध्याच्या कोरोना संकटाच्या वेळी गावे आणि गरीबांसाठी मोठी मदत म्हणून समोर आली आहे. ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे तो खाण्यापिण्याच्या समस्येस सामोरे जाऊ शकत नाही. खेड्यांमध्ये यावेळी प्रत्येक कुटुंबात सरासरी पाच लोकं आहेत. अशा कुटुंबांना दरमहा फक्त 75 रुपये देऊन 50 किलो तांदूळ आणि … Read more

सर्वसामान्यांना बसला धक्का ! पुन्हा एकदा वाढली डिझेलची किंमत, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सध्या सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL, IOC ने शुक्रवारी पुन्हा एकदा डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ केली आहे. 17 दिवसांत डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाली, तर पेट्रोलची किंमत ही स्थिर राहिली. डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीत … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more