पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपाचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी आज मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. पुरुषोत्तम यांच्या घरवापसीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांत जल्लोषाचे वातावरण असून सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला जाणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने २०१४ साली सातारची जागा आरपीआय पक्षाला दिल्याने पुरुषोत्तम जाधव यांनी सेनेला सोडचिठ्ठी दिली … Read more

श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी कराड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची गुरुवारी कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना फेटा बांधला. पाटील आणि उदयनराजेंच्या या भेटीमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीनिवास पाटील … Read more

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव आणि माथाडी नेते नरेंन्द्र पाटील उदयनराजेंविरोधात लोकसभा लढवणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. आता यामध्ये आणखी एका उमेदवाराची भर पडली असून तृथीयपंथीयांचा उमेदवार म्हणुन प्रशांत वारेकर निवडणुक रिंगणात … Read more

राजकारणातील बालहट्ट पुरविताना जाणता राजा चक्रव्युव्हात

Untitled design

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पक्षातील लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हट्टपुरवताना चक्रव्यव्हात अडकले आहेत. एकिकडे राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाची अधिकृतपणे कोणतीही यादी जाहीर झाली नसून आपला मार्ग निवडायला आपण मोकळे आहोत असं वक्तव्य केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे तर दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव … Read more

पवारांची जादू, उदयनराजे व शिवेंद्रराजे एक दिलाने निवडणूक लढवणार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभेच्या जागेचा अखेर सस्पेन्स संपला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मनोमीलन तुटल्यानंतर एकमेकांना पाण्यात पाहणार्‍या दोन्ही राजांमध्ये दिलजमाई करण्यात खा. शरद पवार यशस्वी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांनी आज ११ वाजता मुंबईत तातडीची बैठक बोलावली … Read more

आणि उदयनराजेंना अश्रू अनावर झाले, व्हिडीओ व्हायरल

IMG

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. आपल्या दबंग स्टाईलने आणि हटके डायलोग बाजी ने उदयनराजे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र सध्या सोशल मिडियावर उदयनराजेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामधे उदयनराजे भाऊक झालेले दिसत असून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे. … Read more