ठाकरे गटाला भाजपचा दणका! बेस्ट कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड

prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच उद्धव ठाकरेंना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बेस्ट कामगार संघटनेच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या अध्यक्षपदी ठाकरे गटाचे सुहास सामंत होते. मात्र आता हे पद भाजपच्या ताब्यात गेले आहे. त्यामुळे आता बेस्ट संघटनेवरील उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व कमी … Read more

राज ठाकरेंशी संवाद साधण्यास उद्धव ठाकरेंनी दाखवली तयारी?; चर्चांणा उधाण

raj thackray uddhav thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात पक्षांमध्ये फुटाफुटी सुरू असताना दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा पार पडणार आहे. कारण, आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत याविषयावर चर्चा … Read more

“तीच ‘रडगाणी’ तेच तराणे.. ‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे…”; केशव उपाध्येंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनातील मुलाखत आज प्रसारित करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी करत भाजपवर आणि शिंदे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्र भाजपपासून ते केंद्रीय नेतृत्वावर ठाकरेंनी तोफ डागली. ठाकरेंनी केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून भाजप नेत्यांकडून आता त्यावर … Read more

मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत; बावनकुळेंचा उध्दव ठाकरेंना टोला

chandrashekhar bavankule and uddhav thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. नुकतीच खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, ‘या देशात आता ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे. एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत’ असे … Read more

“आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, रोज नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर साधला. “विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो,”असा टोला ठाकरे यांनी लगावला. मुंबईत पार पडलेल्या दरबार हॉलच्या उद्धघाटन कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद … Read more

राजाबरोबर आता प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्या वतीने सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आणि पन्नास टक्के क्षमतेने काम करण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आजारपणामुळे घरातूनच काम करीत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वर्क फ्रॉम होमवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. आता … Read more

यशोमती ताई तुम्ही आमची आन बान आणि शान आहात – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याबद्दल महत्वाचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमधून यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचे विधान केले आहे. “यशोमती ताई तुम्ही आमची आन बान आणि शान आहात. असे म्हणत वाघ यांनी महिला आयोगाला अध्यक्षपद मिळवून देण्याच्या यशोमती ठाकूर यांच्या मागणीला पाठींबा … Read more

महाराष्ट्र प्रेमाचं सर्टिफिकेट देणारे तुम्ही कोण?? कंगनाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. आता तर तिने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे कर्तृत्त्व नव्हे, अशा शब्दांत अभिनेत्री कंगना राणौतने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर शिवसेनेकडून कंगनावर टीकेचा भडिमार सुरु … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

मुंबई| ठाकरे सरकारची तुलना मुघल राजाशी केल्याने एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीत ठक्कर या मुंबईतील एका यूजर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून … Read more

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये ‘हा’ मोठा फरक आहे : शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तीमत्व होतं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक असल्याचेही पवारांनी म्हटलं आहे. … Read more