रामदास आठवलेंचा अपेक्षाभंग! मित्रपक्ष भाजपाने एकही तिकीट न दिल्यानं केलं नाराजीचं ट्विट

मुंबई । राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीत भाजपने ४ पैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं होतं. मात्र, भाजपने चारही जागांवर … Read more

भाजपने तिकीट नाकारल्यावर निष्ठावंत खडसे म्हणाले, ‘पक्षाला शिव्या घालणाऱ्यांना मान दिला गेला,पण..

जळगाव । विधान परिषदेची उमेदवारी नाकारली गेल्यामुळं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी ४० ते ४२ वर्षे एकनिष्ठ राहून भाजपचं काम करतोय. पक्ष वाढवताना अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. चढउतार पाहिले. आतातरी मला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचं काम करणाऱ्यांना … Read more

खडसे, मुंडेंना भाजपचा पुन्हा दे धक्का! विधान परिषदेसाठी उभे केले ‘हे’ ४ उमेदवार

मुंबई। येत्या २१ मे ला होऊ  घातलेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपकडून ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. संख्याबळानुसार भाजपला चौथ्या जागेसाठी काही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर नवीन चेहऱ्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या ओबीसी नैतृत्व एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने … Read more

विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडे, म्हणाल्या..

मुंबई । येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पक्षाच्या कोअर कमिटीचा … Read more

भाजपाने आपल्या कोट्यातील एक जागा आरपीआयला द्यावी – रामदास आठवले

मुंबई ।  येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. या ४ जागांपैकी एक जागा भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला द्यावी अशी मागणी आज रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक … Read more

राज्यसभा नाही दिली किमान विधानपरिषदेची तर जागा द्या!- एकनाथ खडसे

जळगाव । येत्या 21 मे रोजी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी मुंबईत निवडणूक होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षानं उमेद्वारीपासून डावलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेच्या जागेची उमेदवारी देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी शिफारस होऊनही निवड झाली नाही, पण आता विधानपरिषदेसाठी तरी माझा विचार करावा, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी … Read more

संग्राम विधान परिषदेचा: शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे निवडणूक रिंगणात

मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक घेण्याची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने … Read more

आम्ही’पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते पण आता.. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई । देशासह संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढा देत असताना काहीजण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीच्या तथाकथित गळचेपीबाबत अनेकांनी राज्यपालांना पत्र लिहिली. तर काहींनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते, पण अशांच्या हाती अपयश आले आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा … Read more

फडणवीसांनी दिल्या उद्धव ठाकरेंना ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा..म्हणाले..

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातील विधान परिषदेच्या जागांवर निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. … Read more

महाराष्ट्राची पुण्याई म्हणून महाराष्ट्र दिनीच ‘हा’ निर्णय झाला- संजय राऊत

मुंबई। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली असून आयोगाच्या या निर्णयाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात आला आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्राची … Read more