दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चालक ठार तर दुसरा जखमी

सातारा | वाई-जांभळी रस्त्यावर धोम गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. तानाजी नवलू शेलार (वय- 32, रा. खावली, ता. वाई) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, वाईच्या पश्चिम भागातील रेणावळे या गावी … Read more

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर साताऱ्यातील जागीच 2 ठार : भीषण अपघातात 15 जखमी

वाई | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील कोंडावळे (ता. वाई) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 15 जण गंभीर जखमी आहेत. अपघातात लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय -24) व गणेश बाळू कोंढाळकर (वय -22) रा. कोंढावळे, ता. वाई, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ निसर्गरम्य ठिकाणाला एकदातरी भेट द्याच…; सिनेसृष्टीलाही पडलीय भुरळ

Satara Scenic Spot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाळा ऋतू असल्याने आठवड्यातील शनिवार आणि रविवार हा आला कि पर्यटक पर्यटनाच्या ठिकाणी हजेरी लावू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातही अशी पर्यटनाची काही ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतायत. जिल्ह्यातील अशा पर्यटन ठिकानांची भुरळ हि सिनेसृष्टीलाही पडली आहे. सातारा जिल्हा हा खरे तर देशातील सर्वोत्तम पर्यटन जिल्हा … Read more

केवळ 2 हजाराची लाच घेताना तलाठी व मदतनीस सापडले

ACB

वाई | सातबारावरील 32 गची नोंद कमी करण्यासाठी मदतनिसाच्या माध्यमातून केवळ 2 हजारांची लाच स्वीकारताना सोनगिरवाडी व सिद्धनाथवाडीचे तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे (वय- 52, रा.फ्लॅट नं. 104, विराटनगर, ता. वाई), तसेच त्याचा खासगी मदतनीस संतोष चंद्रकांत भिलारे (वय- 43, रा. धावडी, ता. वाई) या दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांनी … Read more

साताऱ्यातील तरूणांच्या खूनात मूळ सूत्रधारासह 5 जणांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील नटराज मंदिराचे बाहेर अज्ञात इसमांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून केलेल्या खुनाच्या गुन्हयातील मुळ सुत्रधारास मुंबई येथून अटक करण्यात आली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अभिजीत ऊर्फ भैया शिवाजी मोरे व सोमनाथ बंडू शिंदे (दोघे रा. वाई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे … Read more

वाई तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी मदन भोसले बिनविरोध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी मदन माधवराव भोसले (बावधन) यांची तर व्हाईस चेअरमनपदी शंकरराव पर्बती शिंदे (पांडेवाडी) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जी. टी. खामकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या. बैठकीस नूतन संचालक मदन भोसले, शंकरराव शिंदे, शिवाजीराव पिसाळ, बाजीराव महागडे, दिलीप वाडकर, … Read more

चक्क ! महामार्गावर पोलिस गाडीलाच उडवून ट्रकसह चालक फरार

सातारा | पुणे- बंगलोर महामार्गावर उडतारेनजिक भुईंज पोलिसांच्या वाहनाला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी पोलीस गाडीत असलेले पोलिस कर्मचारी होते, त्यांना काहीही दुखापत झालेली नसली तरी रस्त्यावर असलेले तीन कामगार गाडीखाली सापडून जखमी झाले. या अपघातात ट्रकसह चालकाने पलायन केले असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. धनसिंग लालू राठोड (वय ४५, रा.उडतारे), विजू भिमू … Read more

पट्ट्या MPSC तून उपशिक्षणाधिकारी… मग काय गावकऱ्यांनी काढली थेट बैलगाडीतूनच मिरवणूक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील बावधन येथील म्हतेकरवाडीचे (ता.वाई) येथील प्रसाद तुकाराम संकपाळ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून जिल्हा उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल ग्रामस्थांनी प्रसादची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. ग्रामीण भागातील वाडी- वस्तीत राहणाऱ्या प्रसाद संकपाळ याने एमपीएससी परिक्षेत यश मिळविल्याने गावकऱ्यांनाही मोठा आनंद झाला होता. गावकऱ्यांनी बैलगाडी सजवून … Read more

जाळ अन् धूर संगट : नवरीसह वऱ्हाडी मंडळीना घेवून निघालेल्या बसला आग

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाड येथून वाईमध्ये आलेल्या वऱ्हाडाच्या खासगी बसला सकाळी नऊच्या सुमारास पसरणी घाट उतरून वाई शहरात आल्यानंतर आग लागली. बसच्या इंजिनमधून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने नागरिकांनी सदरची घटना चालकाच्या निदर्शनास आणली. चालकाने तात्काळ सावधानता बाळगत नवरीसह वऱ्हाडीमंडळीना गाडीतून खाली उतरले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीतून … Read more

किसनवीर कारखान्याच्या अध्यक्षपदी आ. मकरंद आबा, उपाध्यक्षपदी प्रमोद शिंदे

सातारा | किसन वीर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद लक्ष्मणराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. कारखान्याच्या निवडणुकीत 19 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्व 21 जागांवर तब्बल 9 ते 9500 हजारांच्या मतांच्या फरकांनी जिंकल्या. किसनवीर कारखान्याच्या … Read more