आत्मसमर्पण करणार्‍या 22 अफगाण कमांडोना तालिबान्यांनी केले ठार, व्हिडिओ होतो आहे व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा 85 टक्के प्रदेश ताब्यात घेतला आहे. ज्यानंतर तिथली परिस्थिती दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी तालिबान सैन्यांने Afghan Special Forces Commandos च्या 22 कमांडोना ठार मारले. ही घटना 16 जून रोजी फारियाब प्रांताच्या दौलतबाद शहरात (Dawlat Abad town) घडली. दौलत आबाद शहर तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आहे. सीएनएनने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप वेगाने व्हायरल होतो आहे. तालिबान सैनिकांनी आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असलेल्या 22 अफगाण कमांडोना गोळ्या घालून ठार मारले.

सीएनएनच्या अहवालानुसार रेडक्रॉसने 22 अफगाण कमांडोचे मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आहे. सीएनएनने आपल्या अहवालात दावा केला आहे की, त्यांच्याकडे असे अनेक व्हिडिओ आहेत. सर्व व्हिडिओ व्हेरिफाय केले गेले आहेत आणि साक्षीदारांशी देखील याबाबत बोलणी केली आहे.

https://twitter.com/NatashaBertrand/status/1414710664782884870?

सीएनएनच्या मते, तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या ताब्यात अद्याप 24 कमांडो आहेत, त्यांना फरियाब प्रांतात ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु अद्याप त्यांना मारण्यात आलेले नाही. सीएनएनच्या वृत्तानुसार, तालिबानी लढाऊ सैनिकांशी झालेल्या भीषण लढाईत अफगाणी कमांडोचा दारुगोळा संपला आणि त्यांना शरण जावे लागले.

रविवारी अफगाण सुरक्षा दलांनी गझनी शहरातील सुरक्षा चौक्यांवरील तालिबानी हल्ले परतवून लावले, अशी माहिती टोलोन्यूज ने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे. तालिबान्यांनी रविवारी पहाटे पीडी 3, पीडी 6, पीडी 1 आणि पीडी 5 मधील सुरक्षा चौक्यांवर हल्ला केला. ज्यानंतर अफगाण स्पेशल फोर्सेसच्या कमांडोने तालिबानी लढाऊ सैनिकांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले. पण लढाई दरम्यान त्याचा दारूगोळा संपला. त्यानंतर तालिबानी लोकांनी त्यांना घेराव घातला.

मात्र, या चढाईच्या तीन दिवसानंतरच तालिबानने दौलतबादमध्ये झालेल्या हत्याकांडाचा व्हिडिओ पोस्ट केला. यात असा दावा केला गेला की, वॉशिंग्टन गार्ड (फगान स्पेशल फोर्सेसचे हे कमांडो) खास प्रशिक्षित कमांडो होते. ते फरियाबमधील तालिबानी लढाऊ सैनिकांचा पाठलाग करत होते. तालिबान लढाऊ लोकांनी त्यांना जिवंत पकडले आणि मृत्यूची शिक्षा दिली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment