तालिबाननकडून पाकिस्तानला इशारा – “सरकारबाबत सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नाही”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल/इस्लामाबाद । अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू करण्यास जोरदार समर्थन देणाऱ्या पाकिस्तानला तेथील ‘नवीन सरकारने’ सडेतोड उत्तर दिले आहे. तालिबानने म्हटले आहे की,”अफगाणिस्तानमध्ये कोणत्या प्रकारचे सरकार स्थापन केले जाईल याची मागणी करण्याचा पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला अधिकार नाही.”

खरं तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेजारच्या अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार बनवण्याचा सल्ला दिला होता, मात्र तालिबानने तो स्वीकारला नव्हता. तालिबानचे प्रवक्ते आणि उपसूचना मंत्री जबीउल्लाह मुजाहिद यांनी डेली टाइम्सला सांगितले की,”पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला या प्रकरणाबाबत बोलण्याचा अधिकार नाही.”

इम्रानने सोशल मीडियावर तालिबानशी झालेल्या चर्चेची माहिती दिली होती. ते म्हणाले- “मी दुशान्बेमध्ये अफगाणिस्तानच्या अनेक शेजारी देशांशी दीर्घ चर्चा केली. या दरम्यान, विशेषतः ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोली रहमान यांच्याशी चर्चा झाली. मी तालिबानशी चर्चा सुरू केली आहे. माझा प्रयत्न आहे की, तेथे एक सरकार स्थापन केले जावे, ज्यामध्ये ताजिक आणि हजारा व्यतिरिक्त उझ्बेक वंशाच्या लोकांनाही समाविष्ट केले जावे.”

इम्रान खान पुढे म्हणाले- “अफगाणिस्तानमध्ये 40 वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. आता सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याची तसेच शांतता आणि स्थिरता आणण्याची वेळ आली आहे. ही सगळ्या अफगाणिस्तानची गरज नसून संपूर्ण प्रदेशाची मोठी गरज आहे.”

त्याचवेळी, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या सदस्य देशांनी म्हटले होते की,” युद्धग्रस्त देशात सर्वसमावेशक सरकार असणे महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये सर्व जातीय, धार्मिक आणि राजकीय गटांचे प्रतिनिधी असतील.” त्याचवेळी तालिबानचे नेते मोहम्मद मोबिन यांनी असेही म्हटले की” सर्वसमावेशक सरकारची मागणी करण्याचा अधिकार कोणालाही अफगाणिस्तानने दिलेला नाही.”
.

Leave a Comment