हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसच्या उद्रेका दरम्यान, शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, फार्मा कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या दिवसेंदिवस याचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. यामध्ये टाटा समूहाने एक नवीन कोविड -१९ टेस्टिंग किट तयार केली आहे. कंपनीने सीएसआयआर-इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) यांच्याशी मिळून क्लस्टरर्ड रेग्युलरी इन्ट्रेंडेड शॉर्ट पालिंड्रोमिक रीपीट्स कोरोना व्हायरस टेस्ट (CRISPR Corona Test) तयार केली आहे. चांगली बातमी अशी आहे की, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी टाटाच्या या नवीन कोविड -१९ टेस्टिंग किट ‘Feluda’ च्या सार्वजनिक वापरास मान्यता दिली आहे.
कोरोना चाचणीमध्ये सीएएस -9 प्रथिने वापरण्याची पहिली चाचणी
टाटा समूहाच्या मते, CRISPR Corona Test ने सर्वात विश्वसनीय RT-PCR टेस्टशी तुलना करता अचूक निकाल दिलेला आहे. तसेच, यास कमी वेळ आणि कमी खर्च लागेल. या टेस्टमध्ये SARS-CoV-2 विषाणूचा जेनॉमिक सीक्वेंस शोधण्यासाठी स्वदेशी CRISPR तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान इतर साथीच्या आजारांच्या चाचणीमध्ये देखील वापरले जाऊ शकते. कंपनीने याबाबतीत म्हटले आहे की, TATA CRISPR Test सीएएस -9 प्रथिने वापरणारी जगातील अशी पहिलीच चाचणी आहे, जी कोविड -१९ साथीच्या रोगाचा प्रसार करणारे व्हायरस यशस्वीरित्या ओळखते.
ही कोरोना टेस्ट किट तयार करण्यासाठी टाटा ग्रुपला अवघ्या 100 दिवसांचा कालावधी लागला
भारतीय वैज्ञानिकांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी कामगिरी असल्याचे टाटा या समुहाने म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की,’ रिसर्च आणि डेव्हलपमेंटपासून ते हाय ऍक्यूरसीपर्यंत, ही स्केलेबल आणि विश्वासार्ह चाचणी किट 100 दिवसांपेक्षा कमी कालावधीत तयार केलेली आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कृष्णमूर्ती म्हणतात की, कोविड -१९ साठी TATA CRISPR Test मंजूर झाल्याने जागतिक साथीच्या आजाराशी लढण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल. TATA CRISPR Test चे कमर्शियलाइजेशन हे देशातील सर्वोत्तम रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रतिभेचे उदाहरण आहे. ही कौशल्य ग्लोबल हेल्थकेअर व साइंटिफिक रिसर्च जगात भारताचे योगदान बदलण्यास मदत करू शकते.
TATA CRISPR Test 98% अचूक निकाल देते
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (Ministry of Science and Technology) म्हणाले की, TATA CRISPR Test ला सामान्य लोकांना वापरण्यासाठी DCGI कडून मान्यता मिळाली आहे. या Test चा निकाल 98 टक्के अचूक लागला आहे. त्याच वेळी, हे 96 टक्के संवेदनशीलतेसह नॉव्हेल कोरोनाव्हायरसला (Novel Coronavirus) ओळखते. कंपनीच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करीत मंत्रालयाने असेही म्हटले आहे की,’ TATA CRISPR Test सीएएस -9 प्रथिने वापरणारी जगातील अशी पहिलीच चाचणी आहे, जिने कोविड -१९ या साथीचा रोग पसरविणार्या विषाणूचा यशस्वीपणे शोध लावला आहे.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.