हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TATA Group : भारतातील सर्वात जुन्या उद्योग समूहांमध्ये TATA च्या नावाचा देखील समावेश आहे. देशातील सर्वांत विश्वासहार्य ब्रँड म्हणून TATA चे नाव आघाडीवर आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटा ग्रुपची एक तरी कंपनी आहेच. आताही लवकरच टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्ट होणार आहे. TATA Group ची टेक कंपनी TATA Technologies ने IPO द्वारे पैसे जमा करण्यासाठी बाजार नियामक SEBI कडे अर्ज दाखल केला आहे.
हे जाणून घ्या कि, जवळपास 18 वर्षानंतर TATA Group चा IPO येणार आहे. याविषयी माहिती द्यायची झाली तर हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल. या द्वारे शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर्स 9.57 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. याशिवाय TATA Group ची आणखी एक कंपनी TATA Play देखील आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
तब्ब्ल 18 वर्षानंतर देशातील हा सर्वात मोठा ग्रुप आपला IPO आणणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी ठरू शकेल. मात्र या IPO विषयी अद्याप कोणतीही माहिती उघड झालेली नाही. तसेच हे देखील तितकेच खरे आहे कि, या IPO विषयीची घोषणा होताच गुंतवणूकदार त्यावर तुटून पडतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.tatatechnologies.com/
हे पण वाचा :
Post Office च्या स्कीममध्ये मिळतोय बँकांमध्ये जास्त रिटर्न, अशा प्रकारे करा गुंतवणूक
Gold Price Today : सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली, तपासा आजची किंमत
PNB खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! बँकेकडून चेक पेमेंटच्या नियमांत बदल
‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!
New Business Idea : उन्हाळ्यात प्रचंड मागणी असणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न