हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंगापूरमध्ये एका शाळेतील शिक्षकास 168 हून अधिक मुलींचे अपस्कर्ट व्हिडिओ (परवानगीशिवाय व्हिडिओ बनवल्याबद्दल) अटक केली आहे. या 47 वर्षीय शिक्षकावर समाजात अश्लीलता पसरविण्याचा आणि महिलांच्या गोपनीयतेचा अवमान केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. पोलिसांनी सांगितले की या आरोपीने काही विद्यार्थिनींचे व्हिडिओ क्लिप हे सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
द स्टारच्या एका रिपोर्ट नुसार या आरोपी शिक्षकाने एप्रिल 2015 ते जुलै 2018 दरम्यान त्याच्या फोनवर 168 हून अधिक विद्यार्थिनींचे अपस्कर्ट रेकॉर्ड केले होते. एप्रिल ते ऑक्टोबर 2015 दरम्यान 8 मुलींचे 15 हून अधिक व्हिडिओ बनवले गेले. याशिवाय जून 2016 मध्ये आरोपीने त्याच्या फोनवर अन्य 8 मुली विद्यार्थिनींचे 8 व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. तर 2017 मध्ये जुलै ते नोव्हेंबर या काळात एकूण 32 महिलांच्या अशा 105 अश्लील क्लिप बनवल्या. पोलिसांनी आरोपीच्या फोनवरून सर्व व्हिडिओ जप्त केले आहेत.
पोलिसांनी सांगितले की आरोपीने फेब्रुवारी 2017 मध्ये त्याच्या एका महिला नातेवाईकाचाही अपस्कर्ट व्हिडिओ बनविला होता. काही दिवसांनंतर आरोपीने शॉपिंग मॉलमध्येही काही महिलांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. आता या आरोपीला 14 जुलै रोजी न्यायालयात हजर केले जाईल. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. आरोपी या व्हिडिओंचे काय करीत होता याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.
मात्र, आरोपीचे हे कृत्य कसे उघड झाले हे पोलिसांनी अजूनही स्पष्ट केलेले नाही. पोलिसांनी यासाठी आरोपीला न्यायालयात हजर केले. जेथे हा आरोपी शिक्षक दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला 1 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. त्याचबरोबर पीडित मुलींची ओळख लपविण्यासाठी संबंधित शाळेचे नावही सार्वजनिक केले गेले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.