एचडीएफसी बँकेत पुन्हा तांत्रिक बिघाड ! ग्राहकांना नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग वापरण्यास येत आहेत अडचणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC Bank) ग्राहक पुन्हा डिजिटल आउटेजच्या समस्येला तोंड देत आहेत. खरं तर तांत्रिक अडचणींमुळे बँकेच्या काही ग्राहकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग वापरण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत बँकेच्या ग्राहकांना या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. बँकेचे ग्राहक सोशल मीडियावर बँकिंग सेवांमध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल तक्रारीही करत आहेत.

बँकेने ग्राहकांना काही काळानंतर पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले
एचडीएफसी बँकेने म्हंटले की,”त्यांच्या काही ग्राहकांना नेट आणि मोबाइल बँकिंगमध्ये अडचणी आल्या आहेत. या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी बँक काम करत आहे.”एचडीएफसी बँकेने ट्वीट केले की, ‘काही ग्राहकांना आमचे नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग अ‍ॅप वापरण्यात त्रास होत आहे. हे सोडविण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करत आहोत. ग्राहकांच्या या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही ग्राहकांना विनंती करतो की, या दोन्ही सुविधांसाठी थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.”

RBI ने नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी घातली होती
डिसेंबर 2020 मध्ये एचडीएफसी बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि युटिलिटी पेमेंट सर्व्हिस ठप्प झाल्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला सर्व लॉन्च आणि नवीन क्रेडिट कार्ड (Credit Card) देण्यास मनाई केली. डिसेंबर 2020 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे. गेल्या 2 वर्षात अनेकदा डिजिटल आउटेज झाल्यामुळे RBI ने हे पाऊल उचलले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group