नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2020-21 सादर केले. आर्थिक सर्वेक्षण 2020 (Economic Survey 2020) मध्ये व्हेज आणि नॉन-व्हेज थाळीच्या (Thalinomics) च्या किंमतींबद्दल माहिती दिली गेली आहे की, कोणती थाळी महाग झाली आहे आणि कोणती थाळी स्वस्त झाली आहे. या सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे की, शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही थाळींचे दर 2019-20 च्या तुलनेत कमी झाले आहेत.
तज्ञाच्या मते, 5 सदस्य असलेल्या प्रत्येक कुटूंबासाठी जिथे प्रति व्यक्तीला दररोज किमान दोन पौष्टिक थाळीचे जेवण करण्यासाठी सरासरी वार्षिक 13087.3 रुपये तर मांसाहार असलेल्या थाळीसाठी सरासरी 14920.3 रुपयांचा फायदा झालेला आहे.
थाळीच्या किंमतीवरील लाभ क्षेत्रानुसार निश्चित केला गेला आहे-
1. उत्तर विभाग
> शाकाहारी थाळी – 13087.3
> मांसाहारी थाळी – 14920.3
2. दक्षिण विभाग
> शाकाहारी थाळी – 18361.6
> मांसाहारी थाळी – 15865.5
3. पूर्व विभाग
> शाकाहारी थाळी – 15866.0
> मांसाहारी थाळी – 13123.8
4. पश्चिम विभाग
> शाकाहारी थाळी – 17661.4
> मांसाहारी थाळी – 18885.2
कशा निश्चित केल्या गेल्या थाळीच्या किंमती
भारतात, जेवणाच्या थाळीचे अर्थशास्त्र (Thalinomics) वर आधारे करण्यात आलेल्या समीक्षे मध्ये पौष्टिक थाळीच्या सतत कमी होत असलेल्या किंमतींविषयी हा निष्कर्ष काढला गेला आहे. या अर्थव्यवस्थेद्वारे भारतातील सर्वसामान्यांसाठी असलेल्या थाळीच्या किंमतीचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
“थालीनॉमिक्स” म्हणजे काय?
“थालीनॉमिक्स” ही एक पद्धत आहे ज्याद्वारे भारतातील फूड अफोर्डेबिलिटी कळते. म्हणजे थालीनॉमिक्स हे दाखवते की, थाळी प्लेट खाण्यासाठी एखाद्या भारतीयांना किती पैसे खर्च करावे लागतात. जेवण हे प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. खाणे-पिणे याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सामान्य जनतेवर होत असतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.