एका केळाचे अनेक गुणकारी उपाय : ‘या’ वेळी खाल्यास लांब राहतील सर्व आजार 

Banana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्या आहारात फळांचे फार महत्व आहे. कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व असतात. याच फळाच्या सेवनामुळे आपल्याला ऊर्जाही मिळत असते. फळांमधील एका विशिष्ट अशा फळाबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. ते फळ म्हणजे केळ हे होय. केळीचे सेवन हे आरोग्यासाठी गुणकारी आहे. अशक्तपणाचा त्रास ज्या लोकांना आहे त्यांनी दररोज सकाळी ब्रेकफास्ट करताना केळीचं सेवन केल्यास त्यांना या समस्येपासून सुटका मिळू शकते.

Health ID Card द्वारे कोणकोणते फायदे मिळतात आणि ते कसे बनवायचे जाणून घ्या

केव्हाही आणि कधीही सहजतेने उपलब्ध होणाऱ्या या फळाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे ते खाल्यास पोट भरल्यासारखे वाटते. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जगात रोज सकाळी केळीचं सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. कारण सकाळी केळाच्या सेवनामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा तयार असते.

Banana

अनेक आजारांवर गुणकारी असलेले केळ शारीरिक बरोबर मानसिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत आहे. कारण यामध्ये ट्रायप्टोफॅन नावाचे एक तत्व असते. त्यामुळे आपल्या शरिरात सेरोटोनिन तयार होते. त्यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर केळीच्या नियमित सेवनामुळं रक्तदाबाचीही समस्या कमी होण्यास मदत होते.

अनेक आजारांवर फायदेशीर  

केळ हे फळ खास करून ह्रदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर असते. कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्याने हार्टची समस्या कमी होण्यास मदत होते.

केळामध्ये असतात ‘हि’ पोषणतत्वे –

केळ हे असे फळ आहे कि त्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यवर्धक व बलदायक असे सर्वाना आवडणारे हे फळ आहे. वर्षातील बाराही महिन्यात उपलब्ध होणाऱ्या केळाची ओळख हि उपवासाचे फळ अशीही आहे. या फळात 110 कॅलरीज असतात त्यामुळे भूक लागलेली असल्यास केळ खाणे उपयोगी ठरते. यामध्ये पोटेशियम, मॅगनीज, लोह, फॉलिक अॅसिड, फायबर्स, स्टार्थव सेल्युलोज अशी कर्बोदके, व्हिटॅमिन B व्हिटॅमिन C, अल्फा कॅरोटिन व बीटा कॅरोटिन ही कॅरोटिनाइड फायटोकेमिकल्स यासारखी शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. केळीत 64.3 टक्के पाणी, 1.3 टक्के प्रथिने, 24.7 टक्के कार्बोहायड्रेट असते. निरोगी शरीरासाठी हे सर्व घटक आवश्यक आहेत.

Banana

केळी खाताना घ्या ‘ही’ काळजी –  

केळी खाण्याचे फायदे अनेक आहेत त्याचबरोबर त्याचे तोटेही अनेक आहेत. केळ हे फळ कोणी खाऊ नयेत, केळी खाण्याची योग्य वेळ याबाबतही आपणास पूर्ण माहिती असणे गरजेचे आहेत.

• केळ हे फळ एका दिवसात 1 किंवा दोनच खावीत. एकदम सकाळी किंवा रात्री खाऊ नये. 

• सर्दी, खोकला झालेला असताना किंवा दम्याचा त्रास असेल तर केळी खाऊ नयेत. 

• केळ खाल्याने मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ नये यासाठी मुलांना हे दुपारच्या वेळेसच खाण्यासाठी द्यावे.

• सकाळी उपाशीपोटी केळी खाल्यामुळे पोटात गॅस तयार होतो. तसेच पोटदुखी, उलटी, अतिसार यासारखे त्रास होतात.

• लठ्ठपणा असल्यास किंवा वजन वाढलेले असल्यास केळी खाऊ नयेत.  

• मधुमेह असलेल्या व्यक्तीने केळी खाणे टाळावे.

हे पण वाचा –

येत्या काही दिवसांत केळी आणि बेबी कॉर्नचे भाव वाढणार, जाणून घ्या यामागील कारण

या देशात केळी 3300 रुपये किलो तर चहा 5200 रुपयांना विकला जात आहे, कॉफीच्या किंमती ऐकून आपल्याला धक्काच बसेल

जाणून घ्या, केळी खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे….

चेहऱ्यासाठी घरगुती पद्धतीने तयार करा केळीचे फेस पॅक ; होईल अशा प्रकारे जबरदस्त फायदा

रोज रात्री दोन केळी खाण्याचे आहेत ‘हे’ जबरदस्त फायदे