‘ती’ने रस्त्यावर कपडे फाडले आणि दीड लाख मागितले, यानंतर प्रियकराने पुढे जे केले ते….

Love
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील वांद्रे परिसरात एका धक्कादायक घटना आहे. यामध्ये प्रियकराने बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचाच गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेनंतर 12 तासांच्या आत वांद्रे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी प्रियकराचे नाव बिपीन विनोद कंडुलना असे आहे. तर मृत प्रेयसीचे नाव इशिता कुंजुर असे आहे. या दोघांची एका वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. यानंतर या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते.

आरोपी बिपीन हा वांद्रे परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला होता. तर मृत मुलगी घरकाम करायची. रविवारी रात्री पीडित मुलगी आरोपीच्या लाल मिठी परिसरातील घरी आली होती. यानंतर या दोघांमध्ये शारिरीक संबध झाले. यानंतर पीडित मुलगी आरोपीकडे दीड लाख रुपयांची मागणी करू लागली. तसेच पैसे न दिल्यास आरोपीला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी प्रेयसीने दिली. यानंतर आरोपीने तिची समजूत काढली आणि ते वांद्रे रिक्लेमेशन परिसरात फिरण्यासाठी गेले. त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सेंट फ्रेंसिस्कोच्या गल्लीत पीडितेने पुन्हा पैसे मागितले. यानंतर आरोपी प्रियकराने तिला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला पण मुलीने त्याचे ऐकून न घेता स्वत:चे कपडे फाडून घेत आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने तिची गळा आवळून हत्या केली.

या तरुणीचा मृतदेह मिळाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणाचा तपास करताना आरोपी आणि मृत मुलीची कोणतीही माहिती नसताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून आरोपीला 12 तासात बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी आणि मृत तरुणी हे दोघेही मुळचे झारखंडचे रहिवाशी आहेत. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.