पुण्यातला चांदणी चौकातला पूल अखेर झाला जमीनदोस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल (bridge demolished) अखेर जमीनदोस्त झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास स्फोटकांच्या साह्याने हा पूल (bridge demolished) पाडण्यात आला. पूलाचा राडारोडा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच त्या ठिकाणी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. रात्रीपासून या पुलावर वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास हा पूल (bridge demolished) पाडण्यात आला.

पुल (bridge demolished) पाडण्यात आम्ही 100 टक्के यशस्वी झालो आहोत. आम्ही ब्लास्ट केला त्याचा आम्हाला फायदा झाला. आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. या पद्धतीला fragmentation असं म्हणतात जे पद्धत twin टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती त्याला impulsive ब्लास्टिंग असं म्हणले जाते. सकाळपर्यंत आमचे काम पूर्ण होईल, असा विश्वास एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर उत्कर्ष गुप्ता यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

कशा प्रकारे पाडला पूल
पूल पाडण्यासाठी (bridge demolished) त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आले होते. 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात आली होती. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हि सर्व मोहीम राबवण्यात आली.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती