एका मुलाखतीसाठी टीव्ही अँकरला चॅनलने दिले 51 कोटी रुपये; जगभरात चर्चेचा विषय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ब्रिटनच्या शाही परिवाराला मीडिया आणि झगमगाटाचा दुनियेमध्ये एक वेगळेच स्थान आहे. शाही परिवाराच्या मुलाखती नेहमी समोर येत असतात. अशीच एक मुलाखत सध्या जगभरामध्ये खूप चर्चेचा विषय बनली आहे. ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल या शाही जोडप्याची वेगवेगळ्या मुद्द्यावरती घेतलेली ही मुलाखत एका वेगळ्या कारणामुळेही प्रसिद्ध झाली आहे. ते म्हणजे, या मुलाखतीसाठी चॅनलने टिव्ही अँकरला तब्बल 51 कोटी रुपये दिल्याचे वृत्त आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार या मुलाखतीसाठी चॅनलने टिव्ही अँकरला 51 कोटी रुपये हे शाही परिवाराच्या मुलाखतीसाठी दिले असल्याची बातमी आल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. हॅरी आणि मेगन हे राजघराण्यातील जोडप आहे. त्यामुळे प्रसारण मुलाखतीसाठी अधिकार खरेदी करण्यासाठी सीबीएस चॅनलने प्रसिद्ध होत यांना ही रक्कम दिली. या प्रसिद्ध अँकरचे नाव हे ओपरा विनफ्री असे आहे.

67 वर्षीय ओपरा विनफ्री या टॉक शो होस्ट, टीव्ही प्रोडूसर, अभिनेत्री आणि लेखिका म्हणून जगप्रसिद्ध आहेत. फोर्ब्स मॅगझिनच्या अहवालानुसार ओपरा विनफ्री या 19 हजार 700 कोटी रुपयांच्या मालकीन आहेत. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबांमध्ये झाला होता. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने अत्यंत हलाखीच्या दिवसांमध्ये गुजराण करून आपली ओळख निर्माण केली आहे. एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून त्यांची आज ख्याती आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.