बापरे !! बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, त्याची किंमत वाचून व्हाल थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात अनेक ठिकाणी सण उत्सवावर बंदी घातली आहे. देशात आता बकरी ईदचा माहोल आहे. सांगली मध्ये सुद्धा ईदचा मोठा माहोल आहे. त्या भागातील एका बकऱ्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. सांगलीमध्ये एक बकरा आहे त्याच्या कपाळी चंद्रकोर आहे त्यामुळे त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याची किंमत दीड लाख रुपये आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार हा बकरा सांगली तालुक्यातील पेड या गावातील आहे. सुरेश शेडगे या व्यक्तीने त्या बकऱ्याचे पालन केले आहे. त्या बकऱ्यांची इतकी किंमत असण्यापाठीमागे कारण म्हणजे त्याच्या कपाळावर एक पांढऱ्या आकाराची चंद्र कोर आहे. हा बकरा १८ महिन्याचा आहे तर त्याचे वजन जवळपास ९० किलो आहे. त्याला हिरव्या गवंतांसोबत चणा डाळ, शेंगदाणे , गहू असे पदार्थ खाऊ घातले जातात.

मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईद चा उत्सव मोट्या आनंदाने साजरा केला जातो. या बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर अनेक बकरींची कुर्बानी दिली जाते. त्यातच जर चंद्राच्या आकाराची खून असलेला बकरी चा बळी दिला तर मुस्लिम धर्मामध्ये शुभ मानले जाते. तसेच त्या बकरीचा पण बळी अल्ला कबूल करतो. अशी मान्यता आहे. त्यामुळे अश्या बकऱ्यांची किंमत इतर बकरी पेक्षा जास्त असते.

Leave a Comment