भाजपमध्ये जाण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीने झाला? अजित पवार स्पष्टच बोलले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तब्बल 40 आमदारांच्यासोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शविला आहे. त्यानंतर आता अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. मात्र असे असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. आता या सर्व चर्चांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय लोकशाहीमध्ये बहुमताने घेतला असल्याचे सांगितले आहे.

अजित पवारांना पत्रकारांकडून भाजपाशी युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, लोकशाही मध्ये बहुमताचा आदर करायचा असतो. लोकशाहीची हीच खरी पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर याचवेळी त्यांनी शरद पवार यांच्या कोल्हापुरात होत असणाऱ्या सभेवर देखील भाष्य केले आहे. “शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे वाटत त्या मी करण्याचा प्रयत्न करतो” असे ठामपणे अजित पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या सभेविषयी भाष्य

माध्यमांशी बोलताना, “शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटतं, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही कुणालाही खासगीत विचारा… आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून समजू नका. शेवटी सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. काही वेळेस विचारधारा वेगवेगळी असू शकते” असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेतलीये..

याचबरोबर , “२०१९ मध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची विचारधारा बाजुला ठेवून शिवसेनेबरोबर आघाडी केली. शिवसेना आणि भाजपा २५ वर्षांपासून मित्रपक्ष होते. भाजपाबरोबर २५ वर्षे युती केलेला मित्रपक्ष अडीच वर्षे चालू शकतो. तर मग पुढच्या काळात युतीतील दुसरा राहिलेला मित्रपक्ष तोही चालून घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेतलीये, असं दाखवण्याचं काही कारण नाही” असं अजित पवार यांनी म्हटले आहे. आता त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया नंतर शरद पवार यांची काय भूमिका असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.