पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्राचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे मात्र हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओरिसाचा परिसर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच दक्षिण तमिळनाडूच्या परिसरात सक्रिय वाऱ्यांची स्थिती कायम आहे तर ओरिसाच्या परिसरात काही प्रमाणात सक्रिय वाऱ्यांची स्थिती असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होणार आहे. तर मराठवाडा विदर्भात शनिवार पर्यंत पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यात साध्या ढगाळ वातावरण, दिवसभर ऊन तर दुपारनंतर वादळी पाऊस पडतो आहे. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा तयार झाला असून कमाल व किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. मागील 24 तासात विदर्भातील ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 40.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान तर महाबळेश्वर येथे 18.1 सेल्सिअस ची सर्वात कमी किमान तापमान नोंदवले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान बुधवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group