देशात करोना लस चोरीची पहिली केस आली समोर; सरकारी दवाखान्यातून 320 लसी चोरीला

corona vaccine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर। राजस्थानची राजधानी जयपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानात कोरोना लसीच्या कमतरते नंतर आता लसही चोरीला जात आहे. जयपूरच्या सरकारी रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीच्या 320 डोस ची चोरी झाली. आरोग्य विभागाने अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे लस देणारे हे रॅकेट सक्रिय झाले आहे का? याची तपासणीही आरोग्य विभाग करणार आहे.

देशभरात कोरोना लस चोरीची ही पहिली घटना आहे. विशेष बाब म्हणजे जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले तेव्हा लस चोरी झालेल्या ठिकाणी फक्त सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत नव्हता. अशा परिस्थितीत रुग्णालयातील एका कर्मचार्‍याच्या संगनमताने ही चोरी केली गेली आहे असा संशय व्यक्त केला जात आहे. करण हे काम कोणच्या तरी मदतीशिवाय अशक्य असे आहे.

राजस्थान हे देशातील दुसरे राज्य बनले आहे, ज्याने सोमवारी दुपारपर्यंत एक कोटींहून अधिक लोकांना लसीकरण केले आहे. राज्याचे वैद्यकीय व आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी राज्यातील वैद्यकीय कर्मचार्‍यांचे एक कोटीहून अधिक लोकांना लसीकरणासाठी अभिनंदन केले. तसेच राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने लसीकरण करण्याचे आवाहन केले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group