उदयनराजेंनी उद्घाटन केलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा होणार उद्घाटन – जिल्हाधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा एकदा उद्घाटन होणार आहे. या ग्रेड सेपरेटरचे फॉर्मल उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत.

सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी ग्रेड सेपरेटर चे काम हाती घेण्यात आले होते. 76 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ग्रेड सेपरेटरच्या बांधणीसाठी तीन वर्ष लागली. तेव्हा पाहणीसाठी आलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक फित कापून उद्घाटन केले होते. यावेळी पालकमंत्री आमदार जिल्हाधिकारी आधी कोणीही उपस्थित नव्हते यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

ग्रेड सेपरेटर पाहणी करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले काही दिवसापूर्वी तेथे गेले असता त्यांनी पाहणी करण्याआधी अचानक उद्घाटनाची फीत कापली होती. त्यानंतर बराच वेळ पाहणी केली व घोषणाबाजीही झाली. यामुळे या गोष्टीची चर्चा शहरामध्ये रंगली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment