सर्वसामान्यांसाठी खूप उपयोगी आहे मोदी सरकारची ‘ही’ स्वस्त भाडे आणि खाण्याची योजना, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे तसेच अनेक लोकांच्या नोकर्‍याही गेल्या आहेत. आता असे झाले आहे की, लोकांना खाण्यासाठी आणि जगण्यासाठीही पैसे नाहीत. हे लक्षात घेता मोदी सरकार लोकांना अनेक सुविधा पुरवित आहे. विविध योजनांतर्गत सरकार कडून गरीब तसेच गरजू लोकांना मोफत भोजन आणि राहण्याची सुविधादेखील पुरविली जात आहे. पीएम मोदी यांनी आज ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. कमी बजेटमध्ये शहरातील गरिबांना घरे उपलब्ध करुन देणारी अफोर्डेबल रेंटल हाउसिंग कॉम्प्लेक्सेज स्कीम (Rental Housing Complexes Scheme) सुरू झाली आहे.

सरकारने नुकतेच आत्मनिर्भर भारत या योजनेंतर्गत ही योजना जाहीर केली. या माध्यमातून सरकार शहरी भागातील गरीब आणि मजुरांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी कमी किंमतीत भाड्याने घरे उपलब्ध करून देईल. यासह, वन नेशन वन कार्डाअंतर्गत मोदी सरकार नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी रेशनकार्डधारकांना मोफत धान्य देत आहे. या योजनेचा आपण कसा फायदा घेऊ शकता हे जाणून घेउयात, ज्याद्वारे आपल्याला खाणे आणि जगणे या दोन्ही गोष्टींमध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

केंद्र सरकारच्या निधीतून तयार केलेली रिकामी असलेली निवासी संकुले अफोर्डेबल रेंटल हाउसिंग कॉम्प्लेक्सेज मध्ये रूपांतरित केली जातील. त्यांच्यासाठी 25 वर्षांचा कंसेशन एग्रीमेंट केले जाईल. पंतप्रधान शहरी गृहनिर्माण योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत पाणी योजना, गटार, स्वच्छता, रस्ता आणि इतर कामेही केली जातील.

या योजनेच्या माध्यमातून सुमारे साडेतीन लाख मजुरांना दिलासा मिळणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ही घरे कामाच्या ठिकाणी तयार केली जातील. यामुळे कामगारांना अनावश्यक प्रवास, ठप्प आणि प्रदूषणमुक्त केले जाईल. सरकारचे म्हणणे आहे की, यामुळे कामगारांना कामाच्या ठिकाणी जाण्याच्या दीर्घ प्रवासापासून मुक्त केले जाईल. याशिवाय त्यांचे खर्चही कमी होतील आणि त्यांचे राहणीमानही सुधारेल.

वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सारखीच आहे. जसे, आपण आपला मोबाईल नंबर कायम ठेवताना दुसर्‍या टेलिकॉम कंपनीची सेवा वापरतो. अगदी त्याचप्रमाणे या रेशन कार्ड पोर्टेबिलिटी अंतर्गत आपण आपला रेशनचा हिस्सा देशातील इतर कुठल्याही भागातून घेण्यास सक्षम असाल. जर रेशनकार्डवर पाच सदस्य असतील आणि ते पाच वेगवेगळ्या राज्यात राहत असतील तर त्यांना त्या त्या राज्यांमधून आपला रेशनचा वाटा मिळू शकेल. या योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो हरभरा देण्यात येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”