रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा सख्या भावानेच केला खून; तलवार हातात घेऊन पाठलाग करत डोक्यात घातला दगड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

कुपवाड शहरातील राणाप्रताप चौकात शनिवारी रात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी उर्फ शुभम परसमल जैन याचा सख्या भावाने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. या प्रकरणी संशयितास कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार सन्या उर्फ शुभम जैन व त्याचा भाऊ शशांक यांच्यात घरगुती कारणातून वादावादी सुरू होती .सनीने चिडून घरातील तलवार घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न करणार असे दिसताच शशांक हा जीव वाचवण्यासाठी पळू लागला. सन्याने हातात तलवार घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला .पाठलाग करताना राणा प्रताप चौकातील रस्त्यावरील दगडाची ठेच लागून सनी रस्त्यावर कोसळला. ही संधी साधून शशांकने रस्त्यावरील पडलेला दगड उचलून सनीच्या डोक्यात घातला. दगडाचा वर्मी घाव बसल्याने सनी जागीच ठार झाला.

ही घटना रस्त्यावर घडल्यने काही नागरिकांनी तातडीने कुपवाड पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नीरज उबाळे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी खून प्रकरणातील संशयित शशांक जैन यास ताब्यात घेतले आहे. सनी काही दिवसापूर्वीच घरफोडी प्रकरणातून जामिनावर सुटला होता. त्यानंतर तो दररोज घरातील व्यक्तींशी वाद घालत होता. तसाच प्रकार शनिवारी रात्री पुन्हा घरात सुरू केला. त्याला कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला होता. मयत सन्यावर एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये चोरी, घरफोडी, मारामारी , आदी गुन्हे दाखल आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.