राज्यांतर्गत वाहन नोंदणीची प्रक्रिया झाली आणखी सोपी, कोणती किचकट प्रक्रिया रद्द केली आहे याबाबत जाणून घ्या

मुंबई | सेकंड हॅण्ड वाहन वाहन खरेदी केल्यानंतर नवीन मालकाच्या नावे ते वाहन नोंद केली जाते. नवीन मालक हा एका राज्यातीलच पण वेगळ्या आरटीओ क्षेत्रातील असेल तर, पूर्वीच्या आरटीओ ऑफिसमधून त्याला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ म्हणजे ‘ द्यावी लागत होती. पण यापुढे एकाच राज्यातील मालकाचा पत्ता बदलण्यासाठी किव्वा वाहनाची मालकी बदलण्यासाठी एनओसीची गरज लागणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 48 नुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यातमध्ये वाहन मालकी हस्तांतरण करण्यासाठी आणि पत्ता बदल करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जारी करावे लागते. मात्र नोंदणीकृत असलेल्या वाहनांच्या मालकाचा राज्यअंतर्गत पत्ता बदलण्यासाठी तसेच वाहनाची मालकी बदलण्यासाठी ही तरतूद लागू नसल्याचे, परिवहन आयुक्तांनी या नवीन आदेशांमध्ये स्पष्ट केले आहे.

वाहनाची मालकी बदलण्यासाठी, मालकाच्या पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी आणि एका आरटीओ कार्यालयमधून दुसऱ्या आरटीओ कार्यालयात हस्तांतरण या कामांच्यासाठी फॉर्म क्रमांक 28 मध्ये एनओसी या प्रमाणपत्राची मागणी केली जात होती. यामध्ये ‘वाहन 4.1’ प्रणालीवर ज्या वाहनांची माहिती उपलब्ध आहे, या वाहनांसाठी ‘एनओसी’ची गरज नाही. त्यामुळे यांच्याकडून एनओसी मागू नये असे. असे आदेश परिवहन आयुक्तांनी राज्याच्या आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like