आज पासून सुरु झाली स्वस्त सोन्याची विक्री; जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर चांगलाच झाला आहे. भविष्यातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारामध्येही सध्याला मोठी घसरण दिसून आली. त्याच वेळी, गुंतवणूकदारांनीही सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत. मात्र,आपणास स्वस्तात सोने घ्यायचे असल्यास, आपण सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेऊ शकता, ज्याचे सब्सक्रिप्शन हे आजपासून सुरु झाले आहे. दुसर्‍या टप्प्यातील या गोल्ड बाँडचे २०२०-२१ आर्थिक वर्षाचे सब्सक्रिप्शन सोमवारी वर्गणीसाठी उघडेल. या योजनेतील सब्सक्रिप्शनची शेवटची तारीख हि १५ मे आहे. सध्याच्या आर्थिक वर्षाचा दुसरा सोन्याचा रोख अशा काळात येणार आहे जेव्हा गुंतवणूकदारांमध्ये सोन्याच्या मागणीत जोरदार वाढ झालेली आहे. सोन्याचा इश्यूचा दर ४५४० रु. आहे

सोमवारी वर्गणीसाठी सुरू झालेल्या सोन्याच्या बाँडचा इश्यू दर सरकारने ४५९० रुपये प्रति ग्राम निश्चित केला आहे. मात्र, जर आपण ऑनलाईन अर्ज करत असाल आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरत असाल तर आपल्याला प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट देखील मिळेल. अशा गुंतवणूकदारांना सोन्याची इश्यू किंमत प्रति ग्रॅम ४५४० रुपये असेल. ही योजना नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू झाली होती. यामध्ये सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे आणि सोन्याच्या खरेदीसाठी वापरण्यात येणारी घरगुती बचत ही आर्थिक बचतीत वापरणे हे यामागील उद्दीष्ट आहे. आपण घरी सोने खरेदी करण्याऐवजी सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास आपण करही वाचवू शकता.

आर्थिक वर्षात केवळ ५०० ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करता येतील –
सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती आर्थिक वर्षात ५०० ग्रॅम पर्यंत सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. एक ग्रॅम ही किमान गुंतवणूक आहे. कोणतीही व्यक्ती किंवा एचयूएफ आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ४ किलो सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. एकंदरीत, बाँड खरेदी करण्यासाठी स्वतंत्रपणे मर्यादा ही ४ किलो आहे, तर ट्रस्ट किंवा संस्थेसाठी ही २० किलो निश्चित केली गेली आहे. योजनेची परिपक्वता ही ८ वर्षे आहे. परंतु, अद्याप आपल्याला बाँड्स विकायचे असल्यास आपल्याला कमीतकमी ५ वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागेल. आपण या योजनेत गुंतवणूक करून आपला कर देखील वाचवू शकता. योजनेंतर्गत गुंतवणूकीवर वार्षिक २.५% व्याज दिले जाईल.

येथून स्वस्त सोने खरेदी करा
सॉव्हरेन गोल्ड बाँडची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडलेली पोस्ट ऑफिस आणि एनएसई व बीएसई मार्फत केली जाते. आपण यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन या बाँड योजनेत सामील होऊ शकता.या बाँडची किंमत ही भारत बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. च्या ९९९ शुद्ध सोन्याच्या शेवटच्या ३ दिवसांच्या सरासरी किंमतींच्या आधारे रुपये मध्ये निश्चित केली जाते.

११ मे ते १५ मे या कालावधीत तिसरी मालिका ८ ते १२ जून दरम्यान सब्सक्रिप्शन होऊ शकते. त्याचा हप्ता १६ जून रोजी जाहीर केला जाईल. ८ ते १२ जून दरम्यानची तिसरी मालिका, ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यानची पाचवी मालिका. त्याच वेळी, सहाव्या मालिकेचे सब्सक्रिप्शन हे ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान घेतली जाऊ शकते. त्याचा हप्ता हा ८ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.