राज्य सरकारच मराठा आरक्षणाविरोधात असून मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत : पडळकरांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडी सरकारवर विरोधकांकडून जोरात टीका केली जात आहे. आघाडी सरकार मराटह आरक्षण देण्यास अपयशी ठरल्याचाही आरोप काहींकडून केला जातो आहे. यात आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “मराठा आरक्षण व ओबीसींच्या विरोधात राज्य सरकार असून या सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत आहे” असा आरोप पडळकरांनी केला आहे.

पंढरपूरचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीकाही केली. यावेळी पडळकर म्हणाले, ” हे सरकार व या सरकारमधील मंत्रीच कार्य अर्थाने आरक्षणाचा वाद पेटवत आहेत. खरं तर तर या सरकारला मराठा समाज व ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाही. आरक्षणावरून या सरकारने एक मोठे षडयंत्र रचले आहे. हे सरकार एक प्रकारचे निष्क्रिय अशा पद्धतीचे आहे. या सरकारला सध्या कोणता निर्णय घ्यायचा हेच कळत नाहीय.

पडळकरांनी यावेळी काँग्रेसवरही टीका केली. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, ” राष्ट्रीवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर काँग्रेसचे मंत्री, नेते नुसते मन डोलावत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना कोणत्याही स्वरूपाची लाज राहिलेली नाही. सरकारने जर मराठा आरक्षणाविरोधात निर्णय घेतला नाही तर आपण सरकारच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेऊ, असा इशाराही यावेळी पडळकर यांनी दिला.

Leave a Comment