पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 15 जणांचा चावा; तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा-जकातवाडी आणि डबेवाडी गावात अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या हल्ल्यात एकुण 15 जण जखमी झाल्याचे समजत आहे. तसेच जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुणी रुपाली माने आणि 23 वर्षीय तरुण देवानंद लोंढे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कुत्र्याच्या चाव्यात जखमी झालेल्या 5 जणांवर अजून देखील उपचार सुरू आहेत.

या गावाच्या शेजारीच सातारा शहराचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोच्या ठिकाणी अनेक भटकी कुत्री येत असतात. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यानेच या दोघांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे सांगणे आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू; सातारा जिल्ह्यातील 'या' गावांत भितीचे वातावरण | Dog

दरम्यान, भटके कुत्रे चावल्याने मृत्यू होण्याच्या घटना तशा तुरळक होतात. रेबिज झाल्यानंतर त्यावर उपचार करणे अनेकदा कठिण होते. इंजिक्शनने इलाज नाही झाला तर रुग्णांचा मृत्यू होतो. जकातवाडी आणि डबेवाडी येथे अनेकांना भटके कुत्रे चावल्याने गावात दहशत पसरली आहे. दोघांचा यात मृत्यू झाल्याने गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment