हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधी होणार? त्याबाबतसुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबद्दल सुनावणी सुरू असून कोर्टाने निवडणुकीबाबत राज्य सरकारला महत्वाचा आदेश दिला आहे. राज्यात ज्या ठिकाणी पाऊस पडत नाहीत त्या भागात निवडणुका घ्यायला हरकत काय आहे? असा सवाल करत त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयोगास कोर्टाने दिले आहेत.
येत्या काही दिवसात पावसाळ्यास सुरुवात होणार आहे. तर अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य स्थानच्या निवडणुका होतील, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्यावयात तसेच कोकण आणि मुंबईत पावसाळ्यानंतर निवडणुका घ्या असे आदेश देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने सांगितले आहे की, राज्य सरकारला आदेश देताना जिथे पाऊस कमी पडतो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या भागात निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.