जगातील सर्वात उंच रेल्वे पुल लवकरच बनून तयार होणार, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे काम जवळपास पूर्णत्वाला आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भामध्ये ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ब्रिजला इन्फ्रास्ट्रक्चरचा अप्रतिम नमुना असल्याचे बोलले आहे. सोबतच, या पुलाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

चिनाब नदीवर बनत असलेला हा रेल्वे पूल 476 मीटर लांब आहे. इंद्रधनुष्याच्या आकाराचा हा रेल्वे पूल एक महत्त्वकांक्षी प्रोजेक्टचा एक हीस्सा आहे. हा पूल कश्मीरला इतर भारताशी जोडणार आहे. 1250 कोटी रुपये या पूलासाठी खर्च आला असून, चिनाब नदीच्या तळापासून याची उंची 359 मीटर असणार आहे. आयफेल टावर पेक्षा हा पुल 35 मीटर जास्त उंच असणार आहे.

आर्किटेक्चरचा उत्तम नमुना असलेला हा पूल भूकंपापासून ही सुरक्षित बनवण्यात आला आहे. 8 रिश्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेचाही हा पूल सामना करू शकणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी नोव्हेंबर 2017 पासून सुरुवात झाली होती. कोकण रेल्वे हा पूल विकसित करत असून, भारताचा सर्वात पहिला केबल स्टे इंडियन रेल्वे ब्रीज आहे. यावरून शंभर किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे धावू शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment