मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाण्याचा निर्धार केला आहे.आपण शिवसेनेत जाणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. त्याप्रसंगी त्यांनी शरद पवार यांच्यावर भाष्य केले आहे.
शिवसेना प्रवेशाचं ठरलं ! सोपलांचा निर्धार ; शिवसेनेत जावून व्हायचे आमदार
शरद पवार यांच्या सोबत मी अनेक वर्ष काम केले असल्याने त्यांच्या बद्दल माझ्या मनात कसलीही कटुता नाही. त्यांच्याबद्दल जो आदर काल होता. तोच आज आहे. आणि तोच उद्या राहणार आहे असे दिलीप सोपल म्हणाले आहेत. याच वेळी दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण देखील स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह होता म्हणून आपण राष्ट्रवादी सोडली आहे. बऱ्याच दिवसापासून अनेक वर्षांपासून सहकारी असणारे लोक मला शिवसेनेत जावा असे म्हणत होते. त्यामुळे त्यांच्या रेट्यापुढे झुकावे लागले आणि मी शेवटी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असे दिलीप सोपल म्हणाले आहेत.
शिवसेना भाजप युती होणार आहे की नाही हे मला माहित नाही. मात्र मी कुस्ती ठरवून व्यायाम करणारा व्यक्ती नाही असे सूचक विधान दिलीप सोपल यांनी केले आहे. त्याच प्रमाणे आपण कोणाच्या ही विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरायला तयार आहे असे देखील दिलीप सोपल म्हणाले आहेत. दिलीप सोपल यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत सध्या भाजपमध्ये आहेत. त्याच प्रमाणे युती झाली तर राजेंद्र राऊत हे अपक्ष उभा राहू शकतात.
बार्शी विधानसभेच्या सर्वात वेगवान बातम्या मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.
पुढील लिंकवर क्लिक करा आणि आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा – http://bit.ly/30zJ2wq
WhatsApp Group Link – Click here to Join Group
WhatsApp Nambar – 9890324729