गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार काय? शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटीलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेत्यांची आज दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा झाली. यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत पाटील यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवास स्थानी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठकी आज पार पडली. जवळपास अडीच तास नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आदी नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगत देशमुख यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलणे टाळले. प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला काय ती माहिती दिली आहे असे म्हणत अजित पवार यांनी अधिक बोलणे टाळले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment