हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा पाठीच्या तक्रारी सतत सुरु असतात. अनेक महिलांनाच नव्हे तर पुरुषांना सुद्धा पाठीचा त्रास जाणवायला सुरुवात होते. पाठीच्या दुखण्यामुळे अनेक वेळा कोणतेच काम करावेसे वाटत नाही. स्वभाव चिडचिडा होतो. आणेल वेळा साधा पाठीचा त्रास सुद्धा मोठ्या आजाराचे कारण ठरू शकते. आपल्या पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, डाव्या किंवा उजव्या बाजूला पीळ देणे आणि पुढे किंवा मागे झुकणे. पुढे दिलेल्या योगासनांच्या नियमित सराव केल्याने पाठीच्या वर दिलेल्या हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात.
पाठदुखीवर उपाय म्हणून घरच्या घरी हि योगासने करू शकता. काही योगासने तुम्ही कुठेही आणि कधीही करू शकता सकाळी काही कारणाने तुम्ही ती केली नसलीत तरी दिवसभरात अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा ५ मिनिटे खर्च करून तुम्ही ती करू शकता. दिवसभरात कधी पाठ दुखायला लागल्यावर तर आवश्य करा. विमानात बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही पाठीचे व्यायाम करू शकता
— पाठीला सर्व बाजूने ताण द्या.
या व्यायामामध्ये तुमच्या पाठीवर सर्वबाजूने ताण पडतो आणि पाठदुखीला आराम मिळतो. बराचवेळ कार चालविल्यावर, मध्येच गाडी कुठेही थांबवा, गाडीतून खाली उतरा, दोन्ही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहा आणि शरीराला ताण देणारी हि आसने करा.
— त्रिकोणासन
या आसनामुळे दंडाचे स्न्यायु, पायाचे स्नायू आणि ओटीपोटाचे स्नायू कार्यक्षम होतात. पाठीचा कणा लवचिक बनतो. तुम्ही स्वयंपाक घरात उभे राहून बराचवेळ काम करत असाल तर थोडावेळ थांबून त्रिकोणासन करा.
— पवनमुक्तासन
या आसनामुळे नितंबांच्या सांध्यांना जास्त रक्त पुरवठा होतो, पाठीच्या खालच्या भागावर पडलेला ताण नष्ट होतो. शक्यतो हे आसन तुम्ही तुमच्या योगा-मॅटवर करा. हे आसन खुर्चीवर बसल्या बसल्या सुद्धा करू शकता. हे आसन केल्याने तुमच्या पाठीच्या खालच्या भागातले स्नायू मजबूत होतात.
— कटिचक्रासन
या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. हाताचे आणि पायाचे स्नायू मजबूत बनतात.
–अर्ध मत्स्येंद्रासन आणि मार्जारी आसन
या वरील आसनांमुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. खुर्चीवर बसून हीच असणे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता.
— भुजंगासन:
या आसनामुळे पाठीचा वरचा भाग जास्त लवचिक होतो. पाठीच्या स्नायूंना मालिश होते. या आसनात बसून लहान मुळे टीव्ही बघताना ज्या अवस्थेंत बसतात. त्या आसनाचा फायदा पाठीला होतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.