हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे पालकमंत्री तसेच राज्यातील कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली असून यासंदर्भातील माहिती स्वतः अस्लम शेख यांनी ट्विट करुन दिली आहे. आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नसून विलगीकरण केल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आपण कोरोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे.
This is to inform that I’ve tested positive for #COVID19. I’m currently asymtomatic and isolating myself.
I request all those who have come in close contact with me to get themselves tested.
I will continue to work from home to serve the people of my state. 🙏🏻
— Aslam Shaikh, INC 🇮🇳 (@AslamShaikh_MLA) July 20, 2020
अस्लम शेख यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माझ्यामध्ये सध्या कोरोनाची कोणती लक्षणे नसून, स्वत:चे विलगीकरण केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी कोरोनाची चाचणी कऱण्याची विनंती करतो. मी घरातून काम करत राज्यातील लोकांची सेवा करण्याचे काम सुरु ठेवणार आहे.
पुढील दोन आठवडय़ांत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय प्रारूपानुसार व्यक्त केला आहे. राज्यात पुढील दोन महिन्यांत संक्रमण नियंत्रित होईल असा अंदाज या प्रारूपानुसार व्यक्त करण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.