हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपले वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढण्याची इच्छा असते. वेगवेगळी ठिकाणे निवडून नवींनवीन पोझ देऊन फोटो काढले जातात. हटके आणि सगळ्यांपेक्षा वेगळा प्रयोग करताना. अनेकांना त्याची किंमतही मोजावी लागते. अनेकदा त्रास हि सहन करावा लागतो. सर्वत्र फोटोशूट चे प्रमाण वाढले आहे. जन्मापासून ते वेगवेगळ्या कर्यक्रमच्या माध्यमातून फोटोशूट केले जाते. सध्या असाच एका फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोशूटचा हटके प्रयोग त्या महिलेच्या जिवावर बेतला म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
भारतीय प्रशासनातील IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी या महिलेच्या व्हिडीओ ट्वीट केला आहे. या फोटोशूट च्या व्हिडीओत अगदी स्पष्ट दिसतेय की, एक महिला हत्तीच्या सोंडेवर बसून फोटोशूट करत आहे. हत्तीनं या महिलेला अगदी फुटबॉलसारखं फेकून दिलं आहे. त्या महिलेचं नशीब चांगलं होतं की सुदैवाने हत्तीनं महिलेला पाण्यातच जमिनीवर फेकलं असत तर त्या महिलाचा जीवच गेला असता. या महिलेला हत्तीच्या सोंडेवर बसून फोटो काढण्याचा शौक चांगलाच महागात पडला.
Beautiful????
What was more beautiful? The lady or the action of the elephant?? pic.twitter.com/NLG2foMozj— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 21, 2020
“सगळ्यात सुंदर काय आहे महिला, कि हत्तीनि सोबत घडलेला प्रसंग? असं भन्नाट कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यानी या व्हिडीओला चांगली पसंती देत . मोट्या प्रमाणात वायरल केला आहे. या व्हिडीओ ला आत्तापर्यंत १० हजार पेक्षा अधिक लोकांनी पहिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.