शिर्डी प्रतिनिधी | अहमदनगरच्या राजकारणात इळ्या भोपळ्याचे वैर असणारे थोरात आणि विखे आज शेजारी-शेजारी बसून दिल्लीला गेल्याची घटना घडली आहे. आज शिर्डी विमान तळावरून सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात शेजारी बसून दिल्लीला गेले आहेत. त्याच झाले असं कि , सुजय विखे निघाले होते अधिवेशनाला आणि बाळासाहेब थोरात निघाले होते पक्ष श्रेष्टींचे आभार मानायला.
माजी आमदार मोहितेंच्या अटकेबद्दल राजगुरूनगरमध्ये शांततेसह दबक्या आवाजात चर्चा
स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांचे आसन शेजारी शेजारीच आले होते. या विमानाने सकाळी १०. ३० वाजता शिर्डी विमान तळावरून दिल्लीच्या दिशेने उडाण घेतले. विखे आणि थोरात यांच्यात या प्रवासा दरम्यान बरीच चर्चा झाली. मात्र त्यांच्या चर्चेचा तपशील उघड झाला नाही. परंतु त्यांचे फोटो मात्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
महाजनांच्या त्या वक्तव्याने आमदार घोलपांचा जीव भांड्यात पडला
थोरात विखे यांचे एकाच पक्षात राहुन स्वअस्थित्वासाठी मोठे युद्ध या आधी महाराष्ट्राच्या राजकारणाने बघितले आहे. त्याच प्रमाणे आता थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात कमळ फुलवण्याचा निर्धारच विखे पाटील यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात १२/ ० असा विधानसभेचा सामना जिंकण्याचा विखेंनी चंग बांधला असतानाच बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसने अध्यक्ष पदाची धुरा सोपवलेली आहे.
भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो ; आमदाराचा खळबळजनक दावा