शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी; महाराष्ट्रात खळबळ…

0
301
Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्वर अोक या निवासस्थानी फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे. कालच 82 वा वाढदिवस श्री. पवार यांचा झाला असून या फोनमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झालेली आहे. जीवे मारण्यासाठी देशी कट्टा वापरण्यात येणार असल्याचेही फोनवरून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद असेल किंवा छ. शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावर सडेतोड भूमिका घेतली होती. खा. संजय राऊत यांना काही दिवसापूर्वी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता शरद पवार यांना फोन आल्याने पोलिस यंत्रणा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

रोहीत पवार आजच बेळगावात दाखल
शरद पवार यांचे नातू व राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार आजच सकाळी काही वेळापूर्वी सीमाभागात पोहचलेले आहेत. अशावेळी शरद पवार यांना धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे आता सीमावाद आणि छ. शिवाजी महाराज यांच्यावरील सीमाभाग वाद यांचा काही संबध आहे, का यांचाही शोध मुंबई पोलिस घेतील.